शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
3
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
4
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
5
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
6
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
7
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
9
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
10
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
11
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

‘तत्काळ’साठी ओळखपत्राची अट शिथिल

By admin | Updated: July 20, 2015 23:03 IST

१ सप्टेंबरपासून अंमलबजावणी ; रेल्वे प्रवाशांना दिलासा.

अकोला : रेल्वे प्रवासासाठी तत्काळ आरक्षण करण्यासाठी ओळखपत्र अनिवार्य होते; पण रेल्वे मंत्रालयाने ही अट शिथिल केली असून, यापुढे प्रवाशांना तत्काळ तिकीट काढण्यासाठी ओळखपत्राची गरज भासणार नाही. या निर्णयाची अंमलबजावणी १ सप्टेंबरपासून होणार असून, यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. प्रवाशांना तत्काळ तिकीट काढण्यासाठी ओळखपत्र अनिवार्य होते. त्यासाठी प्रवाशांना ओळखपत्राच्या झेरॉक्सप्रती आणि ओळखपत्रावरील क्रमांक अर्जावर अंकित करावा लागत होता. इंटरनेटद्वारे तत्काळ तिकीट आरक्षित करताना प्रवाशांना आपल्या ओळखपत्राची प्रत, तसेच त्यावरील क्रमांक नोंदवावा लागत होता. तत्काळकरिता या अटी येत्या १ सप्टेंबरपासून शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रस्तावित सुधारणेनुसार तत्काळ तिकीट काढणार्‍या प्रवाशांना प्रवासादरम्यान ओळखपत्र सोबत असणे अनिवार्य करण्यात आले आहे. तिकीट कलेक्टरच्या पडताळणीदरम्यान ते सादर न करू शकल्यास ह्यत्याह्ण तिकिटावर प्रवास करणार्‍या सर्व प्रवाशांकडून संपूर्ण प्रवास भाडे आकारले जाईल. त्यामुळे तत्काळ योजनेचा लाभ घेणार्‍यांना यापुढे प्रवासादरम्यान निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड, मोटार वाहनचालक परवाना, केंद्र किंवा राज्य शासनाचे ओळख प्रमाणपत्र, मान्यताप्राप्त शाळा किंवा महाविद्यालयाचे ओळखपत्र, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक, लॅमिनेटेड फोटोसहित बँकांद्वारा दिले जाणारे क्रेडिट कार्ड, आधार कार्ड, राज्य किंवा केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांतर्गत, जिल्हा किंवा स्थानिक प्रशासनाद्वारा वितरित ओळखपत्रांपैकी एकाची मूळप्रत सोबत अनिवार्य राहणार आहे.

*एजंटांना पुन्हा सुगीचे दिवस?

         तत्काळकरिता ओळखपत्राची अट शिथिल केल्यामुळे पूर्वीप्रमाणेच एजंटांना सुगीचे दिवस येण्याची भिती भुसावळ मंडळ अधिकार्‍यांनी व्यक्त केली. जीआरपी व आरपीएफ पोलिसांना आरक्षण खिडक्यांवर अधिक सतर्क राहावे लागणार आहे. इंटरनेटवर ऑनलाईनच्या माध्यमातून तत्काळ तिकिटांचा काळाबाजार होण्याची अधिक शक्यता असल्याची बाब अधिकार्‍यांनी स्पष्ट केली.