अकोला : तत्काळ आरक्षण करण्यासाठी ओळखपत्र सादर करण्याची अट रेल्वे मंत्रालयाने शिथिल केली. या निर्णयाची अंमलबजावणी १ सप्टेंबरपासून होणार असून, यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. प्रवाशांना तत्काळ तिकीट काढण्यासाठी ओळखपत्र अनिवार्य होते. त्यासाठी प्रवाशांना ओळखपत्राच्या झेरॉक्स प्रती आणि ओळखपत्रावरील क्रमांक अर्जावर अंकित करावा लागत होता. या अटी येत्या १ सप्टेंबरपासून शिथिल होणार आहे.तथापि, रेल्वे मंत्रालयाच्याया निर्णयामुळे एजंटांना पुन्हासुगीचे दिवस येण्याची भीतीभुसावळ मंडळ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. आॅनलाइनच्या माध्यमातून तत्काळ तिकिटांचा काळाबाजार होण्याची अधिक शक्यता असल्याची बाब अधिकाऱ्यांनी स्पष्ट केली. (प्रतिनिधी)
‘तत्काळ’साठी ओळखपत्राची अट शिथिल
By admin | Updated: July 21, 2015 00:54 IST