शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
2
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
3
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
4
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
5
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
6
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
7
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
8
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
9
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
10
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
11
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
12
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
13
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
14
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
15
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
16
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
17
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
18
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
19
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
20
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

श्याम ते ओबामा यांची आदर्श

By admin | Updated: May 7, 2017 06:57 IST

आई... असा नुसता उल्लेख जरी केला, तरी मागच्या पिढीसमोर ‘श्यामची आई’ उभी राहते. एकेकाळी आदर्श आईची प्रतिमा उभी

- अरविंद वैद्य -आई... असा नुसता उल्लेख जरी केला, तरी मागच्या पिढीसमोर ‘श्यामची आई’ उभी राहते. एकेकाळी आदर्श आईची प्रतिमा उभी करण्याचे काम साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ने केले. आताच्या काळात तशी प्रेमस्वरूप, वात्सल्यसिंधू आई गरजेची आहे? ती तशी असू शकते का? श्यामची आई आता कालबाह्य झाली आहे का, असे प्रश्न मातृदिनानिमित्त उभे राहिले... त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न.भिंतीवर लटकणाऱ्या कॅलेंडरवरील १४ मे कडे लक्ष गेले आणि एकदम त्या दिवशी ‘मातृदिन’ आहे, याची आठवण झाली. आईमुलांमधील नात्याचा सन्मान करण्यासाठी ‘मातृदिन’ जगात वेगवेगळ्या भागांत, वेगवेगळ्या दिवशी साजरा करतात. भारतात तो १४ मे रोजी असतो. मराठी मनावर गेली अनेक वर्षे आदर्श आई म्हणजे ‘श्यामची आई’ असे समीकरण बिंबले आहे. पूज्य साने गुरुजी यांनी ‘श्यामची आई’ या आत्मकथनपर पुस्तकात आपली आई यशोदाबाई यांनी जे संस्कार आपल्या बालवयात आपल्यावर केले, त्याचे हृद्य वर्णन प्रामुख्याने केले आहे. त्याखेरीजही तत्कालीन कोकण, खोतीचे संबंध, चित्पावन ब्राह्मण घरातील वातावरण याचे वर्णनही आहे. गुरुजींचा जन्म १८९९ मधला! त्यांची आई १९१७ मध्ये निवर्तली. शेवटची काही वर्षे शिक्षणाच्या निमित्ताने गुरुजी आईपासून दूर होते. याचा अर्थ त्यांचे निवेदन हे बालवयातील आठवणींवर आधारलेले आहे. विचारांपेक्षा भावनांना तेथे जास्त स्थान आहे. ‘श्यामची आई’ एका पुस्तकापुरतीच मर्यादित राहिली असती, तर तत्कालीन अन्य पुस्तकांप्रमाणे त्या काळात असलेला शिक्षणाचा प्रसार पाहता समाजातील एका वरच्या स्तरातच परिचित झाली असती. तसे झाले नाही, कारण गुरुजींचे १९५१ मध्ये निधन झाल्यानंतर १९५४ मध्ये आचार्य अत्रे यांनी या कथेवर चित्रपट काढला.चित्रपटाचे माध्यम हे प्रिंट माध्यमाच्या बरेच पुढे जाते. चित्रपटानंतर बालक श्याम म्हणून लोकांच्या समोर येतो, तो माधव वझे आणि आई म्हणून साकार होतात, त्या वनमालाबाई. गुरुजींना आपली आई ही परमआदरणीय असल्याने त्यांनी तिचे रेखाटन हे ‘आदर्श’ या सदरात जाणारे केले आहे. आचार्य अत्रे यांच्या चित्रपटाने ‘श्यामची आई’ आदर्श म्हणून तिला आणखी वर नेले आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आदर्श बनते, तेव्हा ती वास्तवतेपासून बरीच दूर जाते. वास्तवातील माणसे ही वास्तव असतात. माणसे असतात. गुणांबरोबर काही दोष त्यांच्या ठाई असणे, हे स्वाभाविक असते. ज्यांच्यात दोषांपेक्षा गुणांचे प्रमाण अधिक असते आणि त्या गुणांना सामाजिक हिताच्या दृष्टीने महत्त्व असलेल्या मूल्यांचे अधिष्ठान असते, तेव्हा ती माणसे अर्थातच श्रेष्ठ असतात. अशा श्रेष्ठ वाटलेल्या माणसाला आदर्श म्हणून पुढे आणताना बहुधा गुण तेवढेच दाखवले जातात आणि आदर्श व्यक्तीचा देव बनतो. ती व्यक्ती माणूस राहत नाही. तिच्याकडे पाहणारा तिच्या मार्गावर चालणारा अनुचर राहत नाही. भक्त बनतो.श्यामच्याच आईला नव्हे, तर एकूण ‘माता’ या संकल्पनेलाच, ‘मातृ देवो भव’ या विचाराला परिणामी असे देवत्व चिकटल्याने केवळ टीव्ही सिरीअलमध्ये सेलिबे्रटीजच नव्हे, तर कोणीही व्यक्ती आपल्या आईबद्दल जाहीरपणे बोलताना आपल्या आईला हेच देवत्व देते. समाजातील स्त्रिया बहुतांशी या साधारणपणे माता होण्याची क्षमता बाळगतात. त्या साऱ्याच जर आदर्श असत्या, तर जगात अपप्रवृत्तीची माणसे दिसलीच नसती. हाती पाळण्याची दोरी असलेल्या या आदर्श स्त्रियांनी जगाचा केव्हाच उद्धार केला असता. जाहीर बोलताना शिष्टाचार म्हणून ‘माता’ या व्यक्तीबद्दल वा संकल्पनेबद्दल जरूर चांगले तेवढेच बोलावे, पण सर्वच माता केवळ ‘माता’ आहेत, म्हणून श्रेष्ठ आहेत, असे त्यांनीही मानू नये आणि त्यांच्याविषयी बोलणाऱ्यांनीही! ‘श्यामची आई’सारखी माता आदर्श का वाटते, याची कारणे शोधून ती आदर्श म्हणून सर्वांसमोर ठेवल्यास ते समाजघडणीसाठी उपकारक ठरेल.हे करण्यासाठी ज्या वातावरणात, वास्तवात श्यामच्या आईसारखी स्त्री जगत होती, ते फोलकट दूर करावे लागेल. कारण, समाजाची स्थिती सारखी बदलत असते. त्याचप्रमाणे एका वेळीही जगाच्या सर्व भागांत एकचएक समाजस्थिती नसते. प्रदेश, निसर्ग, भाषा, चालीरीती, जात, धर्म, आर्थिक स्थिती या अनेक घटकांमुळे वेगवेगळ्या वातावरणात आपण सारे जगत असतो. हे सारे दूर केले की, मग ज्याला निके सत्त्व म्हणतात, अशी जीवनमूल्ये हाताशी येतात. माणूस श्रेष्ठ-कनिष्ठ ठरतो, तो या जीवनमूल्यांच्या आधारे.माझा गेली ५० वर्षे शिक्षण क्षेत्राशी जिवंत संबंध आहे. त्यातील निरीक्षणाच्या आधारे मी असे म्हणतो की, श्यामच्या आईचा जेवढा परिचय आणि प्रभाव ७० च्या दशकापूर्वी होता, तेवढा तो आता तरुणांवर राहिलेला नाही. आजच्या मराठी भाषिक तरुणांपैकी किती जणांनी ‘श्यामची आई’ वाचली असेल वा चित्रपट पाहिला असेल, ही शंका आहे. जग एवढे झपाट्याने बदलले आहे आणि बदलत आहे की, त्यांना ते पुस्तक वाचायला दिल्यास वा चित्रपट पाहायला लावल्यास ते प्रभावित होणे कठीण आहे. त्यामुळे तसे न करता ‘श्यामची आई’ जी मूल्ये देते, ती मूल्ये नव्या पिढीच्या परिचित असलेल्या संदर्भात त्यांच्यासमोर आणली पाहिजेत.तसे करायचे तर ‘श्यामच्या आईच्या’ रत्नागिरी जिल्ह्यातल्या एका वरच्या जातीतल्या, खोताच्या घरातल्या, त्या जुन्या काळातला कॅन्व्हॉस आपल्याला सोडावा लागेल. सर्व जगाला कवेत घेण्यासाठी श्यामच्या आईप्रमाणेच आदर्श असलेल्या, जीवनमूल्ये असलेल्या आईविषयीच्या विविध देशांतील आणि भाषांतील कलाकृती आपल्याला उपयोगात आणाव्या लागतील. उदाहरण द्यायचे, तर मराठी भाषेतील नारायण सुर्वे यांच्या ‘आई’ या कवितेचे किंवा रशियन पार्श्वभूमीवरील गोर्कीच्या ‘मदर’ चे वा पर्ल बर्क यांच्या चीनमधील क्रांतीपूर्व वातावरणातील ‘दी मदर’चे देता येईल. अगदी अलीकडचे उदाहरण द्यायचे, तर अमेरिकेचे चार महिन्यांपूर्वीच निवृत्त झालेले राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या आईचे देता येईल. ओबामा यांनी आपल्या आत्मचरित्रात तिचे खूपच छान वर्णन केले आहे.आदर्श माता होण्यासाठी लागणारे गुण, ते अविचल पद्धतीने जोपासण्यासाठी लागणारी पायाभूत अशी जीवनमूल्ये शोधण्याच्या, अभ्यासण्याच्या माता या श्यामची आई, राणा प्रताप यांची आई जिजाबाई किंवा ओबामांची आई यांच्यासारख्या खऱ्याखुऱ्या स्त्रिया असू शकतात. तशाच त्या मदर इंडिया, मदर, दी मदर यासारख्या कल्पनेतल्या व्यक्तिरेखाही असू शकतात. त्यांचे परिसर वेगवेगळे असल्याने त्यांच्या रूपाने समोर उभे केलेले आदर्श समाजातील सर्वत्र स्तरांतील लोकांना आपले वाटतील. हे आदर्श स्थलकालाच्या बंधनापासून मुक्त असतील. सर्वच मातांना अनुकरणासाठी शक्य असे असतील आणि सर्वांना आदरणीय असतील.मला असे वाटते की, जगातल्या अशा असंख्य आदर्श वाटाव्या, अशा मातांची चरित्रे जर एकत्र केली, अभ्यासली तर जाणवेल की, त्या प्रत्येकीचा परिसर वेगळा असला, तरी वृत्ती एक आहे. कोणती आहे ती वृत्ती? काळ खडतर असला तरीही कोणत्याही परिस्थितीत जिद्द न सोडता झगडण्याचा त्यांचा स्वभाव. झगडताना जो मार्ग स्वीकारायचा, तो प्रामाणिकपणावर, सचोटीवर आधारलेला असणे, आपण असे वागत असताना आपल्या मुलांनाही त्या तसेच वागायला लावतात. प्रसंगी कठोर होतात, त्याला वागणे सुधारावे म्हणून शासन करतात. या वृत्तीच्या निकषावर श्यामची आई, मदर इंडिया वा ओबामांची आई एकाच प्रकारे आदर्श ठरतात. मातृदिनाला मातेच्या या मानवी, पण आदर्श प्रतिमेचा जागर करण्याची गरज आहे.