शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

''हिंदुत्वाची कल्पना ही ब्राह्मणकेंद्री''

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 06:16 IST

आनंद करंदीकर : समाजवादी कार्यकर्ता संमेलनाचा समारोप

संगमनेर (जि. अहमदनगर) : हिंदुत्वाची कल्पना ही ब्राह्मणकेंद्री आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आजही पुरूषसत्ताकपद्धती असून महिलांना तेथे स्थान नाही. त्यांची संस्कृती महिलांना दुय्यम स्थान देणारी आहे, असे मत डॉ. आनंद करंदीकर यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्यसैनिक भास्करराव दुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगमनेरमध्ये दोन दिवसीय समाजवादी कार्यकर्ता संमेलनाचा समारोप रविवारी झाला. त्यावेळी ‘राष्ट्रवाद’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षण तज्ज्ञ प्रा. हरजिंदर सिंह (कवी लालटू) होते. व्यासपीठावर राष्ट्रसेवा दलाचे प्रदेश कार्याध्यक्ष गोपाळ नेवे, माजी कार्याध्यक्ष राजाभाऊ अवसक उपस्थित होते.डॉ. करंदीकर म्हणाले, गोमांस खात नाहीत ते राष्ट्रभक्त आणि हिंदुत्वाचा पाठपुरावा न करणारे राष्ट्रविरोधी असे चित्र निर्माण करण्यात आले आहे. सध्या हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व झाले आहे. बाहेरून हल्ला करणाऱ्यांच्या विरोधात राष्ट्रवादाची कल्पना निर्माण झाली. एका कालखंडात ती जन्माला आली. ती स्थिरावण्याच्या आधीच भारतीय विचारवंतांनी ही कल्पना टाकाऊ असल्याचे सांगितले होते.एनआरसी नोंदणीला विरोध करण्याचा ठराव समाजवादी कार्यकर्ता संमेलनात चार ठराव मांडण्यात आले.

नागरिक दुरूस्ती विधेयकात धर्माच्या आधारावर भेदभाव करण्यात आला असल्याने हा संविधानाला मोडीत काढण्याचा डाव आहे. राष्ट्र सेवा दलाचे सर्व सैनिक या विधेयकानुसार नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी स्वत:ची माहिती देणार नाहीत आणि एनआरसी (राष्ट्रीय नागरिक रजिस्टर) नोंदणीला विरोध करणार आहेत.

केंद्र आणि राज्य सरकार यांनी स्त्री सुरक्षेसाठी योग्य ती सर्व जरूरीची पाऊले उचलावीत आणि स्त्रियांना न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर, कठोर असावे. सर्व कायद्यांची अंमलबजावणी व्हावी. शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर सरकारने योग्य ती तत्परता दाखवावी, शिक्षणाचा सर्वांना हक्क मिळावा. पुढील समाजवादी संमेलन साने गुरूजी यांची कर्मभूमी जळगाव जिल्ह्यात घेण्यात यावे, असे ठराव मंजूर करण्यातआले.