शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई क्रिकेट संघटनेवर प्रशासक नेमण्याचा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 05:11 IST

लोढा समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणीसाठी, प्रशासकांची समिती नेमण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)ला मंगळवारी दिले. या समितीवर नियुक्त करण्यास सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची नावे सादर करण्यासाचे निर्देश, न्या. शंतनू केमकर व मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने बीसीसीआय व एमसीएला दिले.

मुंबई  -  लोढा समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणीसाठी, प्रशासकांची समिती नेमण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)ला मंगळवारी दिले. या समितीवर नियुक्त करण्यास सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची नावे सादर करण्यासाचे निर्देश, न्या. शंतनू केमकर व मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने बीसीसीआय व एमसीएला दिले.एमसीएची येत्या १६ एप्रिल रोजी विशेष सर्वसाधारण सभा आहे. मात्र, ही सभा प्रशासकांच्या समितीच्या देखरेखीखालीच होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या समितीत एमसीएच्या संविधानाचा मसुदा अंतिम करण्यात येणार आहे, परंतु या संविधानात लोढा समितीच्या शिफारशीही समाविष्ट करता येऊ शकतात का? यावर सर्वसाधारण सभेत चर्चा होणार आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, लोढा समितीच्या शिफारशी पूर्णपणे स्वीकारण्यात येत नाहीत, तोपर्यंत प्रशासकांची समितीच एमसीएची धुरा सांभाळेल, असेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले. ‘तुम्ही (एमसीए) आनंदाने आणि स्वखुशीने प्रशासकांची नावे सुचविली पाहिजेत. तुम्ही आदर्श घालून द्या,’ असे न्यायालयाने म्हटले. ‘शरद पवार आणि दिलीप वेंगसरकर यांनी राजीनामा दिला. अन्य लोक अपात्र ठरले आणि एकाने प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यामुळे तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आणि लोढा समितीच्या शिफारशी स्वीकारल्या पाहिजेत,’ असे न्या. केमकर यांनी म्हटले.दरम्यान, बीसीसीआयनेही एमसीएच्या कारभारावर टीका केली. एमसीएने १६ एप्रिल रोजी केलेली बैठक ही केवळ धूळफेक असून, गेले १८ महिने त्यांनी लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी काहीच पावले उचलली नाहीत, असे बीसीसीआयतर्फे ज्येष्ठ वकील विराग तुळजापूरकर यांनी न्यायालयाला सांगितले. एमसीएशी संलग्न असलेल्या मुस्लीम स्पोर्ट्स क्लबचे सदस्य नदीम मेमन यांनी एमसीएतर्फे सुरू असलेली टी-२० मुंबई लीग स्पर्धा तत्काळ रद्द करावी, तसेच एमसीएने लोढा समितीच्या शिफारशींवर अंमलबजावणी न केल्याने एमसीएवर प्रशासक नेमण्यात यावा, अशी विनंती त्यांनी याचिकेत केली आहे. या याचिकेच्या सुनावणीत न्यायालयाने बीसीसीआय व एमसीएला बुधवारपर्यंत प्रशासकांची समिती नेमण्यासाठी, सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची यादी सादर करण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :Cricketक्रिकेटCourtन्यायालय