शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

खासगीकरणाच्या विरोधात ‘आयडीबीआय’ कर्मचा-यांचे अभिनव आंदोलन!

By admin | Updated: November 4, 2015 03:14 IST

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री व खासदारांना पाठविणार पोस्टकार्ड.

राम देशपांडे/अकोला : इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड (आयडीबीआय) च्या खासगीकरणाच्या विरोधात बँकेच्या कर्मचार्‍यांनी अभिनव आंदोलन छेडले असून, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांसह सर्व राज्यातील मंत्री व खासदारांना पोस्टकार्ड पाठवून प्रस्तावित खासगीकरण थांबविण्याची विनंती वजा मागणी केली जात आहे. आयडीबीआय बँक भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असून, सर्वसाधारण क्रमावरील भारतातील चौथी मोठी बँक आहे. १९६४ पासून देशाच्या अर्थकारणात महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या या बँकेचे खासगीकरण झाल्यास देशभरातील १८ हजारांहून अधिक कर्मचार्‍यांना नवृत्तिवेतन तथा शासनाच्या इतर विविध योजनांपासून वंचित राहावे लागेल. खासगीकरणाच्या दिशेने वाहत असलेले हे वारे रोखून धरण्यासाठी आयडीबीआयचे सर्व कर्मचारी सरसावले आहेत. प्रारंभी ह्यडेव्हलपमेंट फायनान्स इंस्टिट्यूटह्ण नावाने ओळखल्या जाणार्‍या या बँकेचे देशातील वाणिज्य क्षेत्रातील प्रभुत्व लक्षात घेऊन केंद्र शासनाने बँकेच्या भागभांडवलात आपला हिस्सा ओतला. सप्टेंबर २00४ मध्ये आरबीआय अँक्ट १९३४ नुसार ह्यआयडीबीआयह्णला आरबीआयद्वारा संचालित केंद्रीय बँकेचा दर्जा मिळाला. ओघानेच आयडीबीआयमधील देशभरातील सर्व कर्मचार्‍यांना केंद्र शासनाच्या कर्मचार्‍यांप्रमाणे नवृत्तिवेतनासह इतर सुविधांचा लाभ मिळू लागला; मात्र केंद्र शासनाने २0१0 पासून वाणिज्य क्षेत्राशी निगडित सर्व बँक कर्मचार्‍यांचे पेंशन 'ऑफ' केले. बँकेच्या संचालकांनी स्वतंत्र निर्णय घेत हा नियम २00८ पासूनच बँकेला लागू केला. तद्नंतर देशात खासगीकरणाचे वारे वाहू लागले. सप्टेंबर २0१५ मोदी सरकारने ह्यआयडीबीआयह्णच्या ७५.४ टक्के भागभांडवलात अधिक दोन कोटी रुपये ओतून ते ८0 टक्केपर्यंत नेण्याचा नेण्याचा निर्णय घेतला. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी तो निर्णय फिरवत ह्यआयडीबीआयह्णचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हय़ातील अकोला, चोहोट्टा आणि आकोट येथे असलेल्या ह्यआयडीबीआयह्णच्या शाखांमधील कर्मचार्‍यांनीदेखील त्यास सर्मथन देत खासगीकरणास विरोध दर्शविणारे पोस्टकार्ड मंगळवारी पाठविले. इंडिया आयडीबीआय ऑफिसर्स असोसिएशन (एआयआयडीबीआयओअ‍े), ऑल इंडिया बँक असोसिएशन (एआयबीए) तथा युनायटेड फायनांस बँक एम्प्लॉई असोसिएशन (यूएफबीईए) या संघटनांनी या अभिनव आंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे.