शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

इचलकरंजीत दररोज ७० कोटींहून अधिक उलाढाल ठप्प

By admin | Updated: July 15, 2017 23:26 IST

महाराष्ट्राच्या मँचेस्टरचे अर्थकारण बिघडले

राजाराम पाटील। -लोकमत न्यूज नेटवर्क --इचलकरंजी (जि. कोल्हापूर) : जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच जीएसटीचे परिणाम दिसू लागले आहेत. मूल्यवर्धन होणाऱ्या प्रत्येक टप्प्यावरील किचकट करप्रणालीची वस्त्रोद्योगातील सर्वच घटकांनी धास्ती घेतली. विशेषत: व्यापाऱ्यांनी कापडाची खरेदी-विक्री बंद केली. परिणामी इचलकरंजीतील कापड उत्पादनात ५० टक्के घट होऊन दररोजची सुमारे ७० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.देशांतर्गत दुष्काळी स्थिती आणि जागतिक पातळीवरील आर्थिक मंदीमुळे २०१५ पासून वस्त्रोद्योग मंदीतून जात आहे. अहमदाबाद, पाली-बालोत्रा, जोधपूर, दिल्ली आदी पेठांमधील कापड व्यापाऱ्यांनी बंद पुकारला असल्याने सौदे बंद झाले आहेत. यापूर्वी झालेल्या सौद्यांचे पैसे येणेही बंद झाले आहे. सुमारे वीस टक्के यंत्रमाग कारखाने पूर्णपणे बंद पडले आहेत. अन्य कारखान्यांतील कापड उत्पादनात ५० टक्के घट झाली आहे. कामगारांचा दररोज ५० टक्के काम व पगार कमी झाला आहे. देशातील ही स्थिती कायम राहिल्यास दीड-दोन आठवड्यांत येथील उद्योग पूर्णपणे बंद पडण्याची भीती व्यक्त होत आहे.कमालीची आर्थिक टंचाईइचलकरंजीतील ९० टक्के कापड अन्य पेठांमध्ये विकले जाते. अहमदाबाद, पाली-बालोत्रा, जोधपूर व दिल्ली येथील व्यापाऱ्यांकडून सुमारे ८० टक्के कापड खरेदी केले जाते. खरेदीअभावी येथे कमालीची आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे.‘जीएसटी’आधीची स्थितीयंत्रमाग : एक लाख (१५ हजार शटललेस लूम, १० हजार सेमी आॅटोलूम) दररोज कापड निर्मिती : १.६० कोटी मीटर रोजगार : ५० हजार (यंत्रमाग, प्रोसेसिंग, सायझिंग)दररोज उलाढाल : १५० कोटी (सूतगिरणी, सायझिंग, यंत्रमाग कारखाने, डाइंग-प्रोसेसिंग कारखाने, गारमेंट युनिट)वाढीव वीज बिलकधी कमी होणार?२०१५ मध्ये राज्यातील यंत्रमागधारक संघटनांनी वाढीव वीज बिलाच्या विरोधात आंदोलन केले. वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी आॅगस्ट २०१६ मध्ये वीज दरामध्ये प्रतियुनिट एक रुपयाची सवलत व यंत्रमागधारकांच्या कर्जावरील व्याज दरामध्ये पाच टक्क्यांची घट करण्याचे आश्वासन दिले, मात्र वर्षभर त्याची पूर्तताच झालेली नाही.अन्य राज्यांच्या तुलनेत राज्यातील दर अधिक असल्याने येथील कापडाचे भाव अधिक राहिले. त्यामुळे कापडाची मागणी कमी झाली. कापड उत्पादकांनी नुकसान सोसून विक्री केली. यंत्रमागधारक व व्यावसायिकांचा ‘जीएसटी’ला विरोध नाही. मात्र, या करप्रणालीमध्ये सरकारने सुलभता आणली पाहिजे. ‘रिव्हर्स मेकॅनिझम’ प्रक्रियेसाठी महिना दीड लाख रुपयांची मर्यादा ठेवावी. पॉलिस्टर यार्नवर लागू केलेल्या १८ टक्के कराचा फेरविचार व्हावा. ३० जूनला असलेल्या सूत व कापडाच्या साठ्यासाठी जीएसटीतून पूर्णपणे सूट मिळाली पाहिजे.- सतीश कोष्टी, अध्यक्ष, इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशनदेशातील आंदोलनाला पाठिंबा म्हणून इचलकरंजीतील कापड व्यापाऱ्यांनी पाच दिवस पेढ्या बंद ठेवल्या होत्या. आता सरकार कापड उद्योगाबाबत अनुकूल निर्णय घेणार असल्याचे समजते. मात्र, योग्य निर्णय न झाल्यास बेमुदत आंदोलन करावे लागेल.- उगमचंद गांधी, अध्यक्ष, इचलकरंजी पॉवरलूम क्लॉथ अ‍ॅण्ड यार्न मर्चंट्स असोसिएशननोटाबंदीचे संकट : नोव्हेंबरमध्ये सरकारने केलेल्या नोटाबंदीचाही मोठा फटका वस्त्रोद्योगाला बसला. परराज्यांतील पेठांमधील कापडाचे येणारे पेमेंट उशिराने येऊ लागले. त्यामुळे काहीशी मंदीसदृश स्थिती झाली.