शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

तुमच्या फायद्याचं! फोनमध्ये ICE ठेवणं आहे अत्यंत गरजेचं, वाचा काय आहे हे?

By सागर सिरसाट | Updated: August 24, 2017 16:50 IST

फोनमध्ये ICE ठेवणं अत्यंत गरजेचं आहे हे वाचून कदाचीत तुम्ही थोडे बुचकळ्यात पडला असाल की नक्की हे काय आहे...याबाबत आम्ही तुम्हाला आज तुमच्या अत्यंत फायद्याची माहिती देणार आहोत. 

मुंबई, दि. 24 - फोनमध्ये ICE ठेवणं अत्यंत गरजेचं आहे हे वाचून कदाचीत तुम्ही थोडे बुचकळ्यात पडला असाल की नक्की हे काय आहे...याबाबत आम्ही तुम्हाला आज तुमच्या अत्यंत फायद्याची माहिती देणार आहोत. 

तुम्ही तुमच्या मोबाईलच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये रोज नवे नंबर सेव्ह करत असतात. नंबर सेव्ह करताना एकतर तुम्ही त्या व्यक्तीच्या नावाने किंवा त्याची आठवण राहील अशा एखाद्या नावाने अथवा तो काम करत असलेल्या कंपनीच्या वा अन्य कोणत्या नावाने करतात. पण यापुढे विश्वासार्ह किंवा जवळच्या व्यक्तीचा नंबर सेव्ह करताना नावाआधी  ICE असं आवर्जून सेव्ह करा. ICE  म्हणजे 'इन केस ऑफ इमरजन्सी'. 

याचा फायदा काय - समजा तुम्ही कधी कोणत्या संकटात सापडला आहात किंवा तुमचा अपघात झाला असेल त्यावेळी घटनास्थळी पोहोचलेले पोलीस सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये ICE नावाने सेव्ह असलेले नंबर सर्च करतात. जे नंबर  ICE नावाने सेव्ह असतील त्यांना तुमच्याबाबत माहिती दिली जाते. त्यामुळे तुम्ही संकटात असल्याची माहिती तुमच्या जवळच्या व्यक्तींना लगेच मिळते.  काय आहे आयसीई-‘इन केस ऑफ इमरजन्सी ‘ ( आयसीई) हे अॅप देखील उपलब्ध असून मुंबई पोलिसांनी ते तयार केलं आहे. प्ले-स्टोअरवर हे अॅप उपलब्ध आहे. याद्वारे चोरी, अपघात , दहशतवादी हल्ले , आग , ट्रेन अपघात आदींबद्दलही माहिती आपल्याला थेट पोलिसांना कळवता येते. याचं वैशिष्ट्य म्हणजे तुमचा अॅलर्ट सरळ पोलिसांकडे जातो. आपण ज्या विभागात असू त्या विभागातील पोलिस स्टेशन्स तसेच पोलिस व्हॅन्समध्ये या अॅपचा अॅलर्ट पोहचतो. परिणामी तुमच्या आसपास असलेली पोलिस व्हॅन लागलीच तुमच्या मदतीला पोहचू शकते.