इंटरनेट वापरत असाल तर सावधान!! तुमची ही माहिती होतेय लीक... परदेशी कंपन्या घेऊ शकतात गैरफायदा

By पवन देशपांडे | Published: August 24, 2017 11:15 AM2017-08-24T11:15:38+5:302017-08-24T12:16:16+5:30

जगातील अर्ध्याहून अधिक जनता वेगवेगळ्या कारणांसाठी रोज इंटरनेटचा वापर करतेय. रोज ईमेल चेक करणे.. मेल पाठवणे... सर्फिंग करणे अन् अनेक साइट्सवरून माहिती मिळवणे...

Be careful if you are using the internet !! You know this leak ... foreign companies can take advantage of the exploitant | इंटरनेट वापरत असाल तर सावधान!! तुमची ही माहिती होतेय लीक... परदेशी कंपन्या घेऊ शकतात गैरफायदा

इंटरनेट वापरत असाल तर सावधान!! तुमची ही माहिती होतेय लीक... परदेशी कंपन्या घेऊ शकतात गैरफायदा

ठळक मुद्देप्रत्येक वेबसाइट तुमच्या आयपी अ‍ॅड्रेसद्वारे तुमच्या स्थळाची माहिती ब्राऊजरकडे पाठवते.तुम्ही कोणत्या देशात... कोणत्या भागात आहात याची माहितीही ब्राऊजर कंपनीला मिळते.

जगातील अर्ध्याहून अधिक जनता वेगवेगळ्या कारणांसाठी रोज इंटरनेटचा वापर करतेय. रोज ईमेल चेक करणे.. मेल पाठवणे... सर्फिंग करणे अन् अनेक साइट्सवरून माहिती मिळवणे... अशा अनेक गोष्टींसाठी इंटरनेट लागतेच. स्मार्ट मोबाइलमुळे तर आता सर्वांच्या हाती इंटरनेटच्या महाजालाची एक डोर पोहोचलेली आहे. पण हीच डोर तुमची सगळी माहिती लीक करू लागली तर... सावधान!! जगात हे असं घडू लागलंय. तुमची माहिती आता चोरली जाऊ लागली आहे आणि इतर कंपन्यांसाठी ती विकलीही जाऊ लागली आहे.

- तुम्ही कुठे आहात?
तुम्ही कोणत्या ठिकाणाहून इंटरनेटचा वापर करत आहात हे सहजरित्या ब्राऊजिंग कंपनीला कळत असते. प्रत्येक वेबसाइट तुमच्या आयपी अ‍ॅड्रेसद्वारे तुमच्या स्थळाची माहिती ब्राऊजरकडे पाठवते. तुम्ही कोणत्या देशात... कोणत्या भागात आहात याची माहितीही ब्राऊजर कंपनीला मिळते.  

- तुम्ही वापरत असलेला कम्प्युटर, लॅपटॉप अन् मोबाइल
ब्राउझिंग करताना तुमच्या कम्प्युटर, लॅपटॉप अन् मोबाइलची इत्यंभूत माहिती ब्राउझर कंपनीकडे जाते. तुमच्या डिव्हाइसमध्ये कोणते सॉफ्टवेअर आहे, कोणत्या प्रकारचे हार्डवेअर आहे, कोणती आॅपरेटिंग सिस्टिम आहे याचीही माहिती कंपनीला जाते. एवढेच नाही तर तुमच्या मोबाइल किंवा लॅपटॉपची बॅटरी किती चार्ज आहे हेही त्यांना त्यांच्या सर्व्हरवर कळते.

- तुम्ही कोणते कनेक्शन वापरता?
इंटरनेट वापरण्यासाठी तुम्ही कोणत्या कंपनीची सेवा घेत आहात, तुमच्या इंटरनेटचा डाउनलोडिंग आणि अपलोडिंगचा स्पीड किती आहे, तुमचा आयपी अ‍ॅड्रेस काय आहे हेही कंपनीला कळते. म्हणजे एखादी कंपनी तुमच्या भागात इंटरनेट सेवा देणारी असेल तर त्या कंपनीला ही तुमची माहिती ब्राउझर कंपनीकडून सहज मिळू शकते.

- तुमचे सोशल मीडिया अकाउंट राहात नाही ‘सिक्रेट’
तुम्ही सोशल मीडियावर लॉग इन केल्यानंतर बºयाचदा आॅनलाइन असल्याचे कोणाला कळू नये म्हणून धडपडत असतो. पण, तुम्ही फेसबुकवर असा किंवा टिष्ट्वटरवर सगळ्या सोशल मीडियाच्या लॉगइनची माहिती ब्राउझर कंपनीला जातेच. त्यातून मग तुम्ही कोणता सोशल मीडिया जास्तीत जास्त वापरता याचा अंदाजही कंपनीला येतो. त्याचवेळी जर तुम्ही एखाद्या शॉपिंग साइटवर असाल किंवा एखाद्या पॉर्नसाइटवर असाल तर तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर येणा-या जाहिरातीही शॉपिंग किंवा पॉर्नसंदर्भात यायला सुरुवात होते.

- तुम्ही नेहमी नेहमी काय करता इंटरनेटवर?
तुम्ही एकदा एखादी साइटवर गेल्यानंतर त्याच साइटसंदर्भातील सज्जेशन्स येत राहतात. तुम्ही नेहमी पाहात असलेल्या वेबसाइटही तुमच्यासाठी पुढे ठेवल्या जातात. पण हे तुमच्या सोईसाठी जसे आहे तसेच ब्राउझर कंपनीसाठीही फायद्याचे आहे. कारण यातून तुमच्या इंटरनेटवरील सर्फींगची माहिती कंपनीपर्यंत पोहोचते. याच डाटाचा वापर करून ते तुमच्यापर्यंत जाहिराती पोहोचवतात.

त्यामुळे ब्राउझिंग करताना सावध राहाणे गरजेचे आहे. युसी ब्राउझर कंपनी भारतीय इंटरनेट वापरकर्त्यांचा डाटा चोरत असल्याचे नुकतेच समोर आलेले आहे. पण ही एक कंपनी नाही जी ब्राउझर सेवा देऊ करते. अशा अनेक कंपन्या भारतात आहेत आणि त्यात नवनवी भर पडतच आहे. त्यामुळे आपण एखादे ब्राउझर वापरताना त्याच्या टर्म्स माहिती असू द्या.

Web Title: Be careful if you are using the internet !! You know this leak ... foreign companies can take advantage of the exploitant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.