शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

सरकारच्या धोरणांना आयएमएचा विरोध

By admin | Updated: August 21, 2016 17:37 IST

डॉक्टर व रुग्णालयांबाबत सरकार वेगवेगळे कायदे करून डॉक्टरांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकारच्या या धोरणांमुळे सामान्य रुग्णांच्या कायम सेवेत असणाऱ्या लहान-लहान रुग्णालयांनाच फटका बसत

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. २१ : डॉक्टर व रुग्णालयांबाबत सरकार वेगवेगळे कायदे करून डॉक्टरांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकारच्या या धोरणांमुळे सामान्य रुग्णांच्या कायम सेवेत असणाऱ्या लहान-लहान रुग्णालयांनाच फटका बसत आहे. यामुळे वैद्यकीय सेवा आणखी महाग होऊन रुग्णांना त्यांची झळ सहन करावी लागत आहे. त्यामुळे सरकारने हे धोरण थांबवावे अन्यथा या विरुद्ध आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)च्या पत्रपरिषदेत देण्यात आला.

आयएमएचे दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन जळगाव येथे आयोजित करण्यात आले होते. त्याचा समारोप रविवारी झाला. या संदर्भात पत्रपरिषद होऊन अधिवेशनात झालेल्या निर्णयांबाबत माहिती देण्यात आली. त्या वेळी हा इशारा देण्यात आला. या पत्रपरिषदेस आयएमएचे राज्याध्यक्ष डॉ. जयेश लेले, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे सदस्य डॉ. रवी वानखेडकर, माजी राष्ट्रीय अध्यक्ष अशोक आढाव, उपाध्यक्ष डॉ. अनिल पाटील, डॉ. वर्षा ढवळे, अविनाश घोळवे, जळगाव शहराध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे, सचिव विलास भोळे उपस्थित होते.

तत्पूर्वी सकाळी डॉ. जयेश लेले व सचिव डॉ. पार्थिव संघवी यांच्याहस्ते उद््घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेश भोळे, गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील उपस्थित होते. उपाध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रगीत व आयएमए प्रार्थनेनंतर बैठक झाली. या वेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून सामाजिक कार्याबद्दल १३ डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.

दुपारी झालेल्या पत्रपरिषदेत बोगस डॉक्टर, क्रॉस पॅथी, डीएमएलटी, पीसीपीएनडीटी, आयुर्वेद रजिस्ट्रार इत्यादी विषयावर १३४ आयएमए शाखांच्या प्रतिनिधींच्या बैठकीविषयी आयएमएच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती देऊन पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे दिली.

तर वैद्यकीय सेवा आणखी महागणार....सरकारकडून वैद्यकीय सेवेला अधिक वेठीस धरले जात आहे. भारतात वैद्यकीय सेवेत ८० टक्के खाजगी तर केवळ २० टक्के वाटा सरकारचा आहे. इतकेच नव्हे आरोग्यासाठीची तरतूदही तोकडी आहे. त्यात सरकार वेगवेगळे कायदे करून छोटे-छोटे रुग्णालय बंद पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. एक प्रकारे सरकार खाजगी मॉल, खाजगी उद्योगांप्रणाणे येथेही खाजगीकरण राबवून मोठमोठ्या हॉस्पिटला चालना देत आहे. यामुळे लहान रुग्णालय बंद पडून वैद्यकीय सेवा आणखी महाग होऊ शकते, अशी शक्यता महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे सदस्य डॉ. रवी वानखेडकर यांनी व्यक्त केली.

या सोबतच रुग्णालयांच्या फायर सेफ्टीबाबतही त्रास दिल्या जात असल्याने या विरोधात राज्यभरात आम्ही माहिती घेऊन सरकारला विचार करायला लावणार आहे. तसेच या विषयी सरकारने धोरण निश्चित करावे, असे, राज्याध्यक्ष डॉ. जयेश लेले यांनी सांगितले. तसा निर्णयही बैठकीत घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.