शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

"रस्ता बनवून देतो अन् पुढच्या वेळी रस्त्यानेच येताे", मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 09:24 IST

Devendra Fadnavis: माओवाद्यांचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्यातील कवंडे या अतिदुर्गम गावात ६ जून रोजी मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. येथे भेट देणारे ते पहिलेच मुख्यमंत्री.

गडचिरोली - माओवाद्यांचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्यातील कवंडे या अतिदुर्गम गावात ६ जून रोजी मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. येथे भेट देणारे ते पहिलेच मुख्यमंत्री. यावेळी मुख्यमंत्रिपदाचा अभिनिवेश न बाळगता व सुरक्षेचे सर्व निकष बाजूला ठेवून ते आदिवासींमध्ये मिसळले. जमिनीवर बसून स्थानिकांशी संवाद साधला. यातून त्यांच्या साधेपणाचे, संवेदनशीलतेचे दर्शन घडले. ‘काळजी करू नका, रस्ता करून देतो अन् पुढच्या वेळी रस्त्यानेच येतो, असा शब्दही त्यांनी दिला.

बॅरिकेड्स हटवून मिसळले लोकांमध्येजनजागरण मेळावा आटोपल्यानंतर सुरक्षेची पर्वा न करता मंचावरून उतरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थेट स्थानिकांच्या दिशेने निघाले. कार्यक्रमस्थळी बॅरिकेड्समुळे त्यांना लोकांमध्ये जाता येईना.मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे पालन करत पोलिसांनी बॅरिकेड्स हटविले. मुख्यमंत्री थेट लोकांमध्ये जाऊन बसले. तुमच्यासोबत बसलो नाही तर प्रश्न कसे कळतील, असे बोलत त्यांनी संवादाला सुरूवात केली. 

रोज सायकलने शाळेत जायचंआदिवासी विद्यार्थिनींशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. एका विद्यार्थिनीला कितवीत शिकते, असे विचारले. तिने आठवीत, असे उत्तर दिले. शाळेत कशी जाते, असे विचारले तेव्हा तिने पायीच जाते, असे सांगितले. त्यावर रोज शाळेत सायकलने जायचं, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर तिला सायकलही दिली. 

अतिदुर्गम ठाण्यातून दौरामुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्याची सुरुवातच थेट छत्तीसगड सीमेवरील कवंडे या अतिदुर्गम पोलिस ठाण्याला भेट देऊन केली. मुख्यमंत्र्यांचा दौरा हेलिकॉप्टरने होता.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस