शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अनू मलिकच्या ‘त्या’ वाक्याने मी खूपच घाबरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 06:02 IST

मुंबई : संगीतकार अनू मलिकवर आरोप करताना श्वेता पंडितने ट्विटमध्ये म्हटले आहे की, २००० साली ‘मोहब्बते’ या चित्रपटात मला ...

मुंबई : संगीतकार अनू मलिकवर आरोप करताना श्वेता पंडितने ट्विटमध्ये म्हटले आहे की, २००० साली ‘मोहब्बते’ या चित्रपटात मला गाण्याची संधी मिळाली होती. त्या वेळी माझे खूप कौतुक झाले होते. मला गाण्यातच करिअर करायचे होते.

अनू मलिक यांचे व्यवस्थापक मुस्तफा यांचा २००१ मध्ये मला फोन आला आणि त्यांनी एम्पायर स्टुडिओत बोलावले. मी खूपच उत्सुक होते. अनू मलिक यांनी मला गाण्यास सांगितले आणि माझ्या गाण्यावर ते खूश झाले?

अनू म्हणाले, मी तुला शान आणि सुनिधीसोबत गाण्याची संधी देईन, पण मला आधी एक किस दे. या त्यांच्या अजब मागणीनंतर मी खूप घाबरले. तेव्हा मी जेमतेम १५ वर्षांची होते. अनू मलिक माझ्या कुटुंबीयांना चांगले ओळखत होते. स्वत:ला दोन मुली असताना ते माझ्याशी असे कसे वागले, हा प्रश्न मला तेव्हा सारखा भेडसावत होता, असे तिने ट्विट केले आहे. या घटनेचा माझ्या मनावर इतका गंभीर परिणाम झाला की मी ही इंडस्ट्री सोडण्याच्या विचारात होते, असे ट्विट श्वेता पंडितने केले आहे.

ज्या तरुणी अनू मलिक यांच्या अत्याचाराला बळी पडल्या आहेत, त्यांनी समोर येऊन आवाज उठवण्याचे आवाहन श्वेताने ट्विटरवर केले आहे. तसेच गायिका सोना मोहपात्राचेही या वेळी तिने आभार मानले आहेत.अनेक मुलींना मी फसवले‘मी टू’च्या वादळात अडकलेल्या साजिद खानने एका मुलाखतीत, मी अनेक मुलींशी खोटे बोललो, त्यांना फसवले आणि मला या गोष्टींचा त्या वेळी फरक पडत नव्हता, असे म्हटल्याचे उघड झाले आहे. तेव्हा साजिद छोट्या पडद्यावर काम करत होता आणि करिअरची गाडीसुद्धा रुळावर होती. त्यानंतर बॉलिवूडमध्ये दिग्दर्शनावर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे त्याने सांगितले. चित्रपट दिग्दर्शनात मग्न झाल्यावर मी फारसा मुलींकडे आकर्षित झालो नाही. तेवढा वेळच मला मिळाला नाही. कारण फार मोठी जबाबदारी तुमच्यावर असते आणि माझ्या या मताशी कदाचित इतर दिग्दर्शकसुद्धा सहमत असतील.

टॅग्स :Anu Malikअनु मलिक