शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
3
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी-video
4
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
5
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
6
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
7
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
8
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
9
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
10
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
11
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
12
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
13
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
14
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
15
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
16
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
17
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
18
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
19
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
20
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स

इचलकरंजी वस्त्रोद्योगात मॉडेल सिटी करू

By admin | Updated: October 13, 2014 00:42 IST

पृथ्वीराज चव्हाण : सुरेश हाळवणकर यांना इचलकरंजीकरांनी नाकारावे

इचलकरंजी : इचलकरंजी हे देशातील वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. म्हणूनच या शहराला वस्त्रोद्योगातील आदर्श शहर म्हणून विकसित करावयाचे आहे. ज्यामुळे इचलकरंजी देशाच्या वस्त्रोद्योगातील ‘मॉडेल सिटी’ ठरेल. तसेच या शहराला वाय-फाय सिटी करू, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.येथील घोरपडे नाट्यगृह चौकात आयोजित केलेल्या प्रचार सभेत चव्हाण बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे होते. हाळवणकर हे वीज चोरी करणारे एकमेव आमदार आहेत, असे सांगून माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, राज्यात एकीकडे शेतकरी वीज कपातीला तोंड देत असताना वीज चोरी करणारा लोकप्रतिनिधी इचलकरंजीतील असल्याची खंत वाटते. जनतेने अशा व्यक्तीला कदापिही स्वीकारू नये. भाजपचे सर्वेसर्वा असणारे नरेंद्र मोदी व अमित शहा महाराष्ट्राला संपविण्यासाठी छुपे राजकारण करीत आहेत, असा आरोप करून ते म्हणाले, केंद्रात सत्तेत आल्यापासून गेल्या चार महिन्यांत त्यांनी अनेक प्रकल्प गुजरातला हलविले. त्यांचा मुख्यमंत्री येथे येऊन मुंबईतील उद्योजकांना गुजरातमध्ये येण्याचे आमंत्रण देत आहेत. अशा मोदींना आणि मोदींच्या भाजपला महाराष्ट्रातील जनता कधीही स्वीकारणार नाही; पण मोदी मात्र सध्याच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या गल्लीबोळातून सभा घेत सुटले आहेत. मोदी मॅजिक टिकविण्याचा आटापिटा करीत आहेत.माझ्या शासनामध्ये धरणात पाणी नसताना, काही तरी म्हणणारे, तसेच कालच्या तासगावच्या सभेत बेजबाबदारपणाचे गैर उद्गार काढणारे मंत्री असतानासुद्धा त्यांना बरोबर घेत अनेक चांगले निर्णय घेतले गेले. दुष्काळ असूनसुद्धा आणि गारपिटीमुळे हजारो हेक्टर जमिनीवरील पिकांचे आणि पर्यायाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असतानाही आपल्या शासनाने दुष्काळ आणि या गारपिटीचा सक्षमपणे सामना केला आणि शेतकऱ्यांना मदत दिली. या सभेमध्ये प्रकाश आवाडे, खासदार प्रकाश हुक्केरी, माजी खासदार जयवंतराव आवळे, भरमूअण्णा पाटील, नगरसेवक शशांक बावचकर, उपनगराध्यक्ष रणजित जाधव, राहुल खंजिरे, किरण कटके, नगरसेवक मोहन कुंभार, संतोष कांदेकर, बाळासाहेब देसाई यांची भाषणे झाली. अहंकारापोटी २५ वर्षांच्या मित्राला काडीमोडभाजपने आपल्या अहंकारापोटी २५ वर्षांच्या मित्राला-शिवसेनेला काडीमोड दिला. ‘अच्छे दिन आनेवाले’ म्हणणाऱ्या भाजपकडे मुख्यमंत्रिपदासाठी एकही चेहरा नाही, हे दुर्दैव आहे. निवडणुका झाल्यावर मोदी काय दिल्लीतून रिमोट कंट्रोलरने राज्य चालविणार आहेत काय, असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला.