शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

उद्यापासून राज्यभर ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ अभियान - अशोक चव्हाण

By admin | Updated: July 11, 2017 20:48 IST

राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे. खोटे आकडे देऊन सरकारने राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. सरकारचा खोटेपणा उघड करण्यासाठी

ऑनलाइन लोकमत
मुंबई दि. 11 - राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे. खोटे आकडे देऊन सरकारने राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. सरकारचा खोटेपणा उघड करण्यासाठी आणि सरसकट सर्व शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेसतर्फे उद्यापासून ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ हे राज्यस्तरीय अभियान राबवणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.
विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली.  त्यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली. सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असली सरकारने घातलेल्या जाचक अटी व शर्तींमुळे बहुतांशी शेतक-यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. ज्या शेतक-यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही आणि ज्यांचा सातबारा कोरा झाला नाही अशा सर्व शेतक-यांच्या सह्या घेऊन सरकारला निवेदन देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शेतक-यांना सरसकट कर्जमाफी द्यावी ही काँग्रेस पक्षाची मागणी कायम असून 30 जून 2017 पर्यंत थकीत असलेल्या सर्व शेतक-यांचे कर्ज माफ करावे तसेच कर्जाचे पुनर्गठण झालेल्या सर्व शेतक-यांचे कर्ज माफ होईपर्यंत काँग्रेस पक्षाचा लढा सुरुच राहील असे खासदार अशोक चव्हाण म्हणाले.
या बैठकीत जीएसटी कायद्याबाबत चर्चा झाली. जीएसटीबाबत जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. हे काँग्रेस सरकारचे जीएसटी विधेयक या विधेयकातील अटींमुळे व्यवसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. जीएसटीमुळे भिवंडी, इचलकरंजी येथील कपडा उद्योग ठप्प झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम हे राज्यभरात विविध ठिकाणी सभा आणि चर्चासत्रांमधून जीएसटीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. पुण्यातून याची सुरुवात होईल असे खासदार अशोक चव्हाण म्हणाले.
या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नसीम खान, बस्वराज पाटील,खा. हुसेन दलवाई  विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस, आ. भाई जगताप,  अमर काळे यांच्यासह नेते उपस्थित होते.