शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीसांच्या १४ ट्विट्सना शरद पवारांचं केवळ तीन शब्दांत हसत हसत उत्तर; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 16:02 IST

देवेंद्र फडणवीसांच्या १४ ट्विट्सना शरद पवारांचं मिश्किल उत्तर; सगळेच हसले

जळगाव: एकापाठोपाठ एक १४ ट्विट करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी अवघ्या दोन शब्दांत हसत हसत उत्तर दिलं. माजी मुख्यमंत्री फडणवीसांनी मला जातीयवादी का म्हटलं याची कल्पना नाही. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आमची भूमिका आहे. समाजातील सर्वच घटकातील व्यक्तींना पक्षात महत्त्वाची पदं देण्यात आल्याचं पवारांनी सांगितलं. ते जळगावात पत्रकारांशी बोलत होते.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल एकापाठोपाठ एक अशी १४ ट्विट्स केली. शरद पवारांनी अल्पसंख्यांकाचं लांगुलचालन केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यासाठी त्यांनी संबंधित बातम्यांच्या लिंक्सदेखील शेअर केल्या. त्यावरून पत्रकारांनी पवारांना प्रश्न विचारला. फडणवीसांनी काल १४ ट्विट करतो. त्यावर तुम्हाला काय वाटतं, असा सवाल पवारांना विचारण्यात आला. त्यावर टीका एन्जॉय करतो, असं मिश्किल उत्तर पवारांनी दिलं.

...म्हणून १२ ऐवजी १३ बॉम्बस्फोट झाल्याचं म्हटलं१९९३ मध्ये मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले. त्यावेळी पवारांनी आकडा एकनं वाढवला आणि मुस्लिमबहुल भागात एक स्फोट झाल्याचा शोध लावला, असं फडणवीसांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यावर पवारांनी स्पष्टीकरण दिलं. १९९३ मध्ये मुंबई बॉम्बस्फोटांनी हादरली. १२ बॉम्बस्फोट झाले होते. हिंदूबहुल भाग लक्ष्य करण्यात आले होते. त्यावेळी मी स्वत: घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती. ती स्फोटक भारतात कुठेही तयार होत नाहीत. त्यांची निर्मिती पाकिस्तानच्या लाहोरमध्येच होते. त्यामुळे या स्फोटांमागे पाकिस्तानच असल्याचं माझ्या लक्षात आलं, असं पवारांनी सांगितलं.

एकूण १३ स्फोट झाले आणि तेरावा स्फोट एका मुस्लिमबहुल भागात झाल्याचं विधान मी जाणीवपूर्वक केलं. कारण धार्मिक तेढ निर्माण करणारे गट, संस्था दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नात होत्या. तसा प्रकार राज्याला परवडणारा नव्हता. मुस्लिमबहुल भागातही स्फोट झाल्याची माहिती दिल्यानं तसा प्रकार घडला नाही. स्फोटांची चौकशी करण्यासाठी स्थापन झालेल्या आयोगानं मला १३ व्या स्फोटाबद्दल प्रश्न विचारला. त्यावेळी मी हेच कारण त्यांना सांगितलं होतं. राज्यातील परिस्थिती नियंत्रणात ठेवणं, कायदा सुव्यवस्था बिघडू न देणं हे त्यावेळी महत्त्वाचं होतं, असं पवार म्हणाले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस