उस्मानाबाद : मी लपून राहिलेलो नाही. मंगळवारी गुढीपाडव्याच्या दिवशी मी उमरगा या माझ्या गावी असेन. दुसऱ्या दिवशी मी लोकसभेच्या कामकाजालाही उपस्थित राहणार आहे, अशी माहिती खा. रवींद्र गायकवाड यांनी ‘पीटीआय’ला फोनवरुन दिली.एअर इंडियाच्या विमानात झालेल्या प्रकाराबाबत बुधवारपर्यंत मीडियाशी बोलण्याचे टाळावे, असा सल्ला पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने दिला आहे. त्यामुळे बुधवारनंतर याविषयी सर्वांशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याने मला शिवीगाळ केली. कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगून खा. गायकवाड म्हणाले, दिल्लीतील घटनेनंतर मला मातोश्रीवरुन बोलावणे आले नव्हते. त्यामुळे तिथे जाण्याचा प्रश्नच नव्हता. तसेच घटनेचा व्हायरल झालेल्या व्हिडीओची चौकशीची मागणीही त्यांनी केली. आपण कुठे आहात, या प्रश्नाला मात्र त्यांनी बगल दिली.उमरगेकरांना गायकवाड यांची प्रतीक्षा आॅगस्ट क्रांती एक्स्प्रेसने गुजरात सीमेवरील वापीला उतरून रस्तामार्गे निघालेले खा. गायकवाड रविवार सायंकाळपर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यात पोहोचले नव्हते, त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांसह शिवसैनिकही त्यांच्या प्रतीक्षेत आहेत. गायकवाड उमरगा येथे येणार असल्याचे समजल्यानंतर रविवारी शिवसैनिकांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. मात्र, दिल्लीहून रेल्वेने निघालेले गायकवाड यांनी प्रसारमाध्यमाचा ससेमिरा चुकवीत थेट मुंबई गाठली व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन परत दिल्लीला रवाना झाल्याचे उमरगा येथील खासदारांच्या संपर्क कार्यालयातून सांगण्यात आले. संसद अधिवेशनात सोमवारी एअर इंडियाच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने हक्कभंग प्रस्ताव आणण्यात येणार असल्याने ते उस्मानाबादला न येता परत दिल्लीला गेले असून, दिल्लीहून ते शुक्रवारपर्यंत परततील, असेही कार्यालयाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)आज उमरग्यात बंदखा. रवींद्र गायकवाड यांना एअर इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करीत शिवसैनिकांच्या वतीने सोमवारी जिल्ह्यात उमरगा, लोहारा आदी ठिकाणी बंद ठेवून निषेध नोंदविण्यात येणार आहे.
मी लपून बसलेलो नाही!
By admin | Updated: March 27, 2017 03:50 IST