शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

मी आणि उद्धवजी बोललो तेच ‘ऑथेंटिक’; देवेंद्र फडणवीस यांची गुगली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 06:08 IST

अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत काहीही ठरलेले नाही

मुंबई : युती कशी कशी होणार या बाबत मी आणि उद्धव ठाकरे युती झाल्याच्या दिवशी जे बोललो ते ‘ऑथेंटिक’ समजा, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाबाबत काहीही ठरलेले नाही, असे रविवारी स्पष्टपणे सूचित केले.

आगामी निवडणुकीनंतर शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर युती तोडा असे मत शिवसेनेचे नेते, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केले होते. त्याला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री पदाबाबत नेमके काय ठरले आहे, असे विचारले असताना मुख्यमंत्री म्हणाले की, मी आणि उद्धव ठाकरे युती झाली त्या दिवशी जे बोललो ते अंतिम समजा. (त्या दिवशी मुख्यमंत्री पदाबाबत दोघेही काहीच बोलले नव्हते.) ‘आम्ही बोललो ते आणि चंद्रकांतदादा वा कदम यांच्या बोलण्यात काही विसंगती असेल तर आमचे बोलणे आॅथेंटिक समजा’, असेही मुख्यमंत्री म्हणाले. आम्ही आधीही सोबतच होतो, उद्यापासूनच्या अधिवेशनातही ते दिसेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपा-शिवसेनेने युती करताना विश्वासात न घेतल्याने इतर मित्र पक्ष नाराज आहेत याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता मुख्यमंत्री म्हणाले की, ते आमच्याच सोबत आहेत. उद्या रासपाचे महादेव जानकर यांच्या निवासस्थानी या मित्रपक्षांची बैठक होणार आहे. गेल्यावेळी भाजपा-शिवसेनेने अनुक्रमे २६-२२ जागा लढविताना मित्रपक्षांना चार जागा दिल्या होत्या.‘ईडी’च्या भीतीने शिवसेनेने युती केल्याच्या आरोपावर ते म्हणाले की, ईडीची भीती वाटावी अशी कामे विरोधकांनी आधी केलेली आहेत. त्यामुळे ईडीची भीती त्यांना वाटावी.बीडच्या पालकमंत्र्यांना अधिकार दिल्याने पोटदुखी; धनंजय मुंडेंना टोलाचारा छावण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना नाही तर पालकमंत्र्यांना अधिकार दिले आहेत. बीडमध्येही तसेच केले ही त्यांची खरी पोटदुखी आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना हाणला. पंकजा मुंडे या बीडच्या पालकमंत्री आहेत.पोलिसांना मारताना दिसताहेत त्यांच्यावरील गुन्हे कायम मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान पोलिसांना प्रत्यक्ष मारहाण करताना जे दिसत आहेत त्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत. अन्य लोकांवरील गुन्हे मागे घेणे सुरू झाले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.त्यांच्यापेक्षा आमची चार वर्षांत जादा मदतआघाडी सरकारच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात शेतकºयांना केलेल्या मदतीपेक्षा कितीतरी जास्त मदत आम्ही चार वर्षांत केली हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी आकडेवारीच दिली. आम्ही ३६१ कोटी रुपयांचे आदिवासींचे खावटी कर्ज माफ केले. १५ वर्षांत त्यांनी पीकविम्यापोटी १ कोटी शेतकºयांना २९३१ कोटी दिले तर आम्ही चार वर्षांत २ कोटी २६ लाख शेतकºयांना १३ हजार १३५ कोटी रुपये दिले. कर्जमाफीचे १८ हजार कोटी रुपये ४४ लाख शेतकºयांच्या खात्यात जमा झाले आहेत.च्पीएम किसान योजनेसाठी सध्या एक कोटी शेतकरी पात्र आहेत. त्यापैकी १४ लाख ५० हजार शेतकºयांच्या खात्यात पैसे टाकणे सुरु झाले आहे, असे ते म्हणाले.धनगर आरक्षण अंतिम टप्प्यातधनगर समाजाला आरक्षण देण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. या आरक्षणाबाबतचा अहवाल कायदेशीर कार्यवाहीसाठी राज्याच्या महाधिवक्त्यांकडे पाठविण्यात आला आहे. खुल्या प्रवर्गातील दहा टक्के आरक्षणाचा फायदा मुस्लिमांनादेखील होईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

त्या जवानांच्या कुटुंबात एकास सरकारी नोकरीपुलवामातील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील दोन जवानांच्या कुटुंबातील प्रत्येकी एकास सरकारी नोकरी दिली जाईल. तसेच दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे