शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मी मनोहर कुलकर्णी नव्हे, संभाजी भिडेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 07:08 IST

प्रथमच संभाजी भिडे यांच्या वतीने अ‍ॅड. पुष्कर दुर्गे न्यायालयात हजर झाले.

पुणे : कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलप्रकरणी म्हणणे दाखल करताना माझे नाव मनोहर विनायक कुलकर्णी नसून माझे नाव संभाजी भिडेच असल्याचे म्हणणे त्यांच्या वकिलांनी आज न्यायालयात सादर केले. दरम्यान, त्यांच्या वकिलांना याप्रकरणी सविस्तर म्हणणे मांडण्यासाठी सर्व कागदपत्रे पुरविण्याचे आदेश विशेष न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी दिले आहेत.गुन्हा दाखल झाल्यानंतर बुधवारी प्रथमच संभाजी भिडे यांच्या वतीने अ‍ॅड. पुष्कर दुर्गे न्यायालयात हजर झाले. दुर्गे यांनी पहिल्याच मुद्द्याचे खंडन करताना भिडे यांचे नाव मनोहर विनायक कुलकर्णी नसून संभाजी भिडेच असल्याचे न्यायालयात सांगितले. तक्रारदार संजय भालेराव यांनी भिडे यांच्याविरोधात तक्रार दाखल करताना त्यांचे नाव मनोहर विनायक कुलकर्णी (वय ५९) असे सांगितले आहे. मात्र, हे नाव चुकीचे असून त्यांचे नाव संभाजी भिडे (वय ८१) असे आहे. त्यामुळे ते दुरुस्त करण्यात यावे, असे सुचविल्याचे अ‍ॅड. दुर्गे यांनी सांगितले. तसेच तक्रारदार यांनी तक्रारीत नमूद केल्यानुसार भिडे यांच्याविरोधातील व्हिडिओ फुटेज, व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग, कोरेगाव-भीमा संर्दभातील पत्रके, फोटो, तक्रार यांची प्रत देण्यात यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली. त्यानुसार न्यायालयाने ही मागणी मान्य करीत तक्रारदार यांनी त्यांच्याकडील माहिती भिडे यांच्या वकिलांना द्यावी, असा आदेश दिला आहे. याप्रकरणी अनिता सावळे या सामाजिक कार्यकर्तीने तक्रार दिलेली आहे. त्यानुसार प्रथमच भिडे यांच्या वतीने सुमारे चार महिन्यांनंतर प्रथमच अ‍ॅड. पुष्कर दुर्गे यांनी म्हणणे सादर केले.भिडे गुरुजी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात त्यांच्यावर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले होते. या घटनेत संजय भालेराव यांची इनोव्हा कार जळाल्याने त्यांनीही न्यायालयात धाव घेत, भिडे यांची ब्रेनमॅपिंग, पॉलिग्राफ चाचणी करण्यात यावी, अशी मागणी वकिलांमार्फत केली होती.याप्रकरणी भिडे गुरुजी यांनी २५ एप्रिलपर्यंत प्रत्यक्ष न्यायालयात येऊन किंवा वकिलांद्वारे त्यांची बाजू मांडण्यात यावी, अशी सूचना न्यायालयाने ४ एप्रिल रोजी दिली होती. त्याबाबत न्यायालयाच्या वतीने मनोहर विनायक कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे या नावाने नोटीसही काढण्यात आली होती.

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी