शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोणालाही घाबरायला मी काही ब्राह्मण नाही- दिलीप कांबळे

By admin | Updated: March 13, 2017 15:43 IST

कोणालाही घाबरायला मी काही ब्राह्मण नाही, मी मागासवर्गीय आहे, असं वक्तव्य सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केलं

ऑनलाइन लोकमतलातूर, दि. 13 - माझ्यामागे आंदोलने केली जात आहेत, कोणालाही घाबरायला मी काही ब्राह्मण नाही, मी मागासवर्गीय आहे, असं वक्तव्य सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचे लोकार्पणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित होते. ते म्हणाले, सामाजिक न्याय विभागातील दलालांची दलाली बंद केल्याने आता काही जण माझ्या मागे आंदोलन करीत आहेत. माझ्यासमोर कोणी घोषणाबाजी केली असती, तर त्यांच्या मुस्कटात लगावली असती. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आंदोलकांना धमकीवजा इशाराच दिला आहे. कांबळे यांनी असे वक्तव्य केल्याने उपस्थितांत उलटसुलट चर्चा होती. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने नांदेडमध्ये शनिवारी (ता. 11) पुरस्कार वितरण कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमानंतर मंत्री आणि शासनाच्या विरोधात आंदोलन केलं होतं. याचा हवाला देत कांबळे यांनी आंदोलकांवर निशाणा साधला आहे. विकासकामात राजकारण करायचे नाही, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. भाजपा सरकार हे गोरगरिबांचे आहे. सामाजिक न्याय विभागातील दलालांची दलाली बंद केली आहे. त्यामुळेच माझ्या बदनामीसाठी काही जण मुद्दामहून आंदोलन करत आहेत. यासंदर्भात व्हॉट्सऍपवर एक क्‍लिप व्हायरल करण्यात आली आहे. माझ्यासमक्ष हे आंदोलन झाले असते तर चांगलीच मुस्कटात लगावली असती. मी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत वाढलेला कार्यकर्ता आहे. मी घाबरणारा नाही, असं दिलीप कांबळे म्हणाले आहेत. त्यानंतर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांनी कांबळेंच्या वक्तव्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. दिलीप कांबळेंचे भाषण ऐकले. निलंगा इफेक्‍ट इतक्‍या लवकर होईल, असे वाटले नव्हते. आज होळी असल्यानं मंत्री जे काही बोलले ते कोणी मनावर घेऊ नये,' असे म्हणत पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिलीप कांबळेंचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र दिलीप कांबळेंच्या कोणालाही घाबरायला मी काही ब्राह्मण नाही या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.