शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

मी कोणत्याच वाघाला घाबरत नाही - मुख्यमंत्री

By admin | Updated: February 26, 2017 04:30 IST

मी वाघ नाही, सामान्य माणूस आहे; आणि सामान्य व्यक्तीला जेव्हा जनतेची साथ मिळते, तेव्हा त्याला १०० वाघांचे बळ मिळते. मी मूळचा विदर्भाचा असल्याने वाघ

मुंबई : मी वाघ नाही, सामान्य माणूस आहे; आणि सामान्य व्यक्तीला जेव्हा जनतेची साथ मिळते, तेव्हा त्याला १०० वाघांचे बळ मिळते. मी मूळचा विदर्भाचा असल्याने वाघ जंगलातला असो वा रस्त्यावरचा, मी कोणत्याच वाघाला घाबरत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले. ‘लोकमत कॉर्र्पोरेट एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड्स’च्या सोहळ्यात महापालिका-जिल्हा परिषद निवडणुकांमधील विजयाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी हा टोला लगावला.वांद्रे येथील ‘हॉटेल ट्रायडंट’मध्ये शनिवारी रात्री ‘लोकमत कॉर्र्पोरेट एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड्स’चा सोहळा पार पडला. या वेळी ‘लोकमत समूहा’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची उत्स्फूर्त प्रकट मुलाखत घेतली. या सोहळ्यात राज्यातील उद्योग, व्यवसाय क्षेत्रातील दिग्गजांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर विजयवीराच्या भूमिकेविषयी आपल्या भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची कविता सादर केली. दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र असे समीकरण झाले आहे का, या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे एकमेवाद्वितीय आहेत, तसा दुसरा कोणी होणे नाही. निवडणुकीतील यश माझे एकट्याचे नसून माझ्यासोबत मोठी ‘टीम’ आहे. जी कधीही चेहऱ्यासाठी भांडत नाही. ‘टीम’ला माझा चेहरा दिला आहे, त्यासाठी ती काम करते. सक्षम ‘टीम’ असली की अडचणी कमी येतात, असेही त्यांनी आवर्जून अधोरेखित केले.ग्रामीण जनतेने भाजपावर इतका विश्वास कसा दाखवला, या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, ग्रामीण भागात दोन वर्षे दुष्काळाचा सामना केला. मात्र त्यानंतर त्याचे रूपांतर संधीत केले. जलयुक्त शिवार योजनेतून आतापर्यंत दुष्काळमुक्तीच्या दिशेने भरपूर काम केले आहे. वर्षाअखेरपर्यंत ११ हजार गावे दुष्काळमुक्त होतील.या सोहळ्याला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक विवेक फणसाळकर, ज्येष्ठ उद्योजक विठ्ठल कामत, अभिनेता विवेक ओबेरॉय, ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी ‘लोकमत’चे उपाध्यक्ष विजय शुक्ला यांनी आभार प्रदर्शन केले. (प्रतिनिधी)खरोखरच झोप उडालीलोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे आता खरोखरच झोप उडाली आहे. आता जागरूक राहत काम करावे लागणार आहे.सरकार स्थिर आहेमहापालिका निवडणुकांनंतर सरकारला धक्का पोहोचेल का, या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी सरकार पूर्णपणे स्थिर असल्याचे सांगितले. सरकारला कोणताही धोका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.५९ मान्यवरांचा गौरव ‘लोकमत कॉर्र्पोरेट एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड्स’ सोहळ्यात विविध क्षेत्रांतील ५९ यशस्वी उद्योजक आणि व्यावसायिकांना ‘लोकमत कॉर्पोरेट एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले.