शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
5
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
6
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
7
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
8
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
9
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
10
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
11
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
12
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
13
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
14
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
15
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
16
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
17
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
18
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
19
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
20
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

दोन मुलांसमोरच पतीने केला पत्नीचा खून

By admin | Updated: May 18, 2017 17:01 IST

मेहुण्याच्या लग्नात सासऱ्याने अंगठी का घातली नाही म्हणून रुसलेल्या जावयाने रागाच्या भरात दोघा मुलांसमोरच पत्नीला हौदावर आपटून, बेदम मारहाण केली आणि विहिरीत फेकून दिले़.

ऑनलाइन लोकमतलातूर, दि. 18  : मेहुण्याच्या लग्नात सासऱ्याने अंगठी का घातली नाही म्हणून रुसलेल्या जावयाने रागाच्या भरात दोघा मुलांसमोरच पत्नीला हौदावर आपटून, बेदम मारहाण केली आणि विहिरीत फेकून दिले़.  गावात येऊन पत्नी विहिरीत पडल्याची आवई उठविली. त्याचा पोलिसांना संशय आल्याने त्यांनी आरोपी पतीस गुरुवारी ताब्यात घेतले.प्रगती दत्ता भिसे (वय २७, रा. मुरुड, जि. लातूर) असे मयत विवाहितेचे नाव आहे. प्रगती भिसे यांच्या भावाचा विवाह सोहळा मंगळवारी (१६ मे) ढोकी (ता. उस्मानाबाद) येथे होता. या विवाह समारंभासाठी दत्ता भिसे, त्यांच्या पत्नी, मुलगा चैतन्य आणि मुलगी भावना हे चौघेजण दोन दिवस अगोदर ढोकी येथे गेले होते. दरम्यान, दत्ता याने मला सोन्याची अंगठी घातली तर मी लग्नासाठी थांबतो, अन्यथा जातोअसे सासऱ्यापुढे सांगितले. तेव्हा सासऱ्यांनी सोने घालण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे रागाच्या भरात आलेला दत्ता हा मुरुडला परतला. मंगळवारी त्याच्या मेहुण्याचे लग्न झाले. मात्र मला कसलाच निरोप देण्यात आला नसल्याचा राग मनात धरून तो बुधवारी दुपारी ४ वाजता ढोकी येथे सासरवाडीस गेला. दरम्यान, दारातच उभा राहून पत्नी व मुलांना गावाकडे परत जायचे आहे असे म्हणून बोलावून घेतले आणि या तिघांना दुचाकीवर बसवून मुरुडकडे निघाला. वानवडा पाटीवरून जवळच्या मार्गे कच्च्या रस्त्याने तो गावानजिक असलेल्या नारायण कणसे यांच्या विहिरीजवळ आला. तिथे दुचाकी उभी करून पत्नीसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. दरम्यान, पत्नीला उचलून विहिरीवर असलेल्या पाण्याच्या हौदावर आपटले. त्यामुळे प्रगती गंभीररित्या जखमी होऊन आरडाओरड करू लागली. त्याकडे दुर्लक्ष करीत त्याने पुन्हा काठीने मारून तिला विहिरीत फेकून दिले आणि मुलांना घेऊन गावात आला. गावात पोहोचताच पत्नी विहिरीत पडल्याचा कांगावा सुरू केला. दरम्यान, मुलांनी पाहिलेली घटना आजी, आजोबांना रात्री सांगितली. त्यामुळे कुटुंबातील सर्वजण फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच मुरुड पोलिसांनी गुरुवारी सकाळी दत्ता भिसे याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर घटनास्थळाकडे धाव घेऊन मयत प्रगती हिचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. दरम्यान, मयत प्रगती हिच्या माहेरकडील मंडळींनी दत्ताविरुद्ध तक्रार दिल्याने कलम ३०२, ३२४, ३२३, ४९८ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळास उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश उनवणे यांनी भेट देऊन पाहणी केली.

काठी, फुटलेल्या बांगड्या जप्त... मुरुड पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता दत्ता याने वापरलेली काठी आढळून आली. तसेच फुटलेल्या बांगड्याही सापडल्या. हे सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

कुटुंब व नातेवाईकही फरार... दत्ता भिसे हा गेल्या काही वर्षांपासून मुरुड येथे राहत आहे. त्याच्या कुटुंबात आई-वडील, पती-पत्नी व दोन मुले राहतात. ही घटना घडल्यानंतर संपूर्ण कुटुंब फरार झाले. गुरुवारी सकाळी त्याच्या घरास कुलूप असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचबरोबर दत्ता याच्या चार बहिणीही गावातच राहतात. मात्र त्यांच्याही घरांना कुलूप असल्याचे पोलिसांना आढळून आले.

मृतदेह शासकीय रुग्णालयात... प्रगती हिचा मृतदेह गुरुवारी सकाळी पाण्याबाहेर काढण्यात आला. शवविच्छेदन आणि उत्तरीय तपासणीसाठी मुरुडच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती सपोनि. रफिक सय्यद यांनी दिली.