लोकमत न्यूज नेटवर्कवसई : पत्नीसोबत कडाक्याचे भांडण झाल्यानंतर एका इसमाने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करू अशी धमकी देत वीरुगिरी केली. या वेळी महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी पतीराजांना सुखरूप खाली उतरवले.भास्कर आळीत राहणाऱ्या संदीप चव्हाण यांचे काल रात्री पत्नीसोबत कडाक्याचे भांडण झाले. रात्रीच्या भांडणामुळे नैराश्य आलेल्या संदीपने सकाळी साडेसात वाजता शेजारी रिकाम्या असलेल्या बंगल्याचे दुसऱ्या मजल्यावरील छत गाठले. त्या ठिकाणी उभा राहून संदीप शोलेतील वीरूप्रमाणे खाली उडी मारून आत्महत्या करू अशी धमकी देऊ लागला. या गोंधळामुळे त्या ठिकाणी अनेक लोक जमा झाले. काहींनी त्याची समजूत काढण्यास सुरुवात केली. पण संदीप ऐकायला तयार नव्हता.शेवटी महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच संदीपला गच्चीवरून सुखरूप खाली उतरवले. >पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर संदीप चव्हाणने वीरुगिरी करीत गच्चीवरून खाली उडी टाकून आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. पण, अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला सुखरूप खाली उतरवले.
पत्नीबरोबर वाद झाल्याने पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Updated: June 9, 2017 04:59 IST