शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवती पत्नीची हत्या केल्याचा पतीवर आरोप

By admin | Updated: January 19, 2017 16:04 IST

यवतमाळमध्ये तीन महिन्यांच्या गर्भवती महिलेची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत

यवतमाळ, दि. 19 - तीन महिन्यांच्या गर्भवती महिलेची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्थानिक भोसा येथे वंदे मातरम चौकातील मंगेशनगरातील ही घटना आहे. शितल मेश्राम असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून त्या परिचारिका होत्या. 
 
शितलच्या पतीनंच तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. शितल पती गजेंद्र मेश्राम जिल्ह्यातील मारेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. गुरुवारी शीतलने गळफास लावून आत्महत्या केल्याचे त्याने सांगितले गेले. मात्र,  प्रत्यक्षात तिच्या शरीरावर मारहाणीच्या गंभीर स्वरुपातील जखमा असल्याचे आढळून आले. 
 
 
यावरुन गजेंद्रनंच शितलची हत्या करुन तिनं आत्महत्या केल्याचा देखावा करत असल्याचा आरोप शितलचे मामा माधव मडके यांनी केला आहे. तशी तक्रार त्यांनी पोलिसात केली आहे. मात्र, वडगाव रोड पोलिसांनी या प्रकरणात हत्येची तक्रार घेण्यास टाळटाळ केल्याचा आरोपही मडके यांनी केला आहे. तक्रार नोंदवून घेण्यासाठी तब्बल पाच तास लागले, असेही मडके यांनी सांगितले. 
 
याप्रकरणी शितलच्या नातेवाईकांना याप्रकरणी वाघापूर रोड वरील शवविच्छेदनगृहासमोर आपला संताप व्यक्तक पोलिसांना धारेवर धरले. शितल ही मूळची वर्धा जिल्ह्याच्या वायफळ येथील रहिवासी होती. सप्टेंबर २०१५ मध्ये तिचा गजेंद्र सोबत विवाह झाला होता. शितलची नेमकी हत्या की आत्महत्या याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे.