शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 06:57 IST

बँकेच्या सेवेत भरती प्रक्रियेद्वारे रुजू होऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराचा जोडीदार राज्य बँकेमध्ये कार्यरत असेल तर असा उमेदवार निवडीस पात्र ठरणार नाही

दीपक भातुसेमुंबई - राज्य सहकारी बँकेने पती व पत्नी या दोघांनाही आपल्या बँकेत नोकरी करण्यास मज्जाव करण्याबाबत धोरण लागू केले आहे. पती व पत्नी एकाच संस्थेमध्ये काम करीत असल्यास संभाव्य हितसंबंध, गोपनीयता तसेच गैरवर्तन टाळण्यासाठी हे धोरण राज्य बँकेच्या प्रशासक सभेत मंजूर करण्यात आले.

घरभाडे भत्ता एकालाचयापूर्वी बँकेत कार्यरत असलेल्या पती-पत्नींसाठीही बँकेने काही निर्णय घेतले आहेत. त्यानुसार पती-पत्नींपैकी ज्या कर्मचाऱ्याचे घरभाडे भत्ता जास्त असेल त्यालाच हा लाभ मिळणार आहे. दोघांना हा लाभ मिळणार नाही. मात्र, वेगवेगळ्या शहरात व स्वतंत्र राहणीमान असल्याचे प्रमाणपत्र दिल्यास दोघांनाही घरभाडे भत्ता मिळेल. मुंबई, ठाणे, नवी मुंबई व पनवेल हे एकच शहर मानले जाणार आहे.

विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारकधोरणानुसार बँकेत कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा विवाह झाल्यास त्यांनी सहा महिन्यांत एचआर विभागाला कळविणे बंधनकारक आहे. विवाहानंतर ६० दिवसांत पती-पत्नीपैकी एकाने नोकरीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. स्वेच्छेने निर्णय न घेतल्यास कोणाला सेवेत ठेवायचे याचा अधिकार बँकेकडे असेल.

भरती प्रक्रियेत स्पष्ट अट : बँकेच्या सेवेत भरती प्रक्रियेद्वारे रुजू होऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराचा जोडीदार राज्य बँकेमध्ये कार्यरत असेल तर असा उमेदवार निवडीस पात्र ठरणार नाही. राज्य बँकेमध्ये यापुढे भरती प्रक्रियेच्या जाहिरातीमध्ये पती व पत्नी असणाऱ्यांपैकी एकासच बँकेत नोकरी करता येणार आहे.

टॅग्स :bankबँक