शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कागदपत्रांसाठी धांदल

By admin | Updated: June 9, 2016 00:59 IST

प्रवेशप्रक्रियेत मुख्यत्वेकरून कागदपत्रे महत्त्वाची असतात. याच कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी नागरी सुविधा केंद्रे व तहसील कार्यालय गर्दीने भरली आहेत.

पुणे : प्रवेशप्रक्रियेत मुख्यत्वेकरून कागदपत्रे महत्त्वाची असतात. याच कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी नागरी सुविधा केंद्रे व तहसील कार्यालय गर्दीने भरली आहेत. त्यामध्ये जातीचा दाखला, रहिवासी दाखला, नॉन क्रिमीलेअरची जुळवाजुळव करण्यासाठी पालकांचीही धांदल उडाली आहे. त्यातच नागरी सुविधा केंद्रचालकांचेही तहसील कार्यालयात हेलपाटे सुरू आहेत. दिवसाला साधारणत: ५०० नागरिक दाखल्यासाठी नोंदणी करीत आहेत. त्यामुळे तहसील कार्यालयातही दाखले वेळेत कसे मिळतील, यावर भर दिला आहे. प्रवेशप्रक्रियेच्या कालावधीतच कागदपत्रे मिळविण्यासाठी आवश्यक असल्याने जास्त पैसे भरण्याची तयारीही काही पालकांनी दर्शविली आहे. मात्र, काही विद्यार्थ्यांनी दहावी प्रवेशानंतर प्रथमच कागदपत्रांची जुळवाजुळव करीत असल्याने, तसेच पालकांना माहिती अपुरी असल्याने धांदल उडत आहे. त्यासाठी तहसील कार्यालयात चौकशी विभाग स्वतंत्र असणे आवश्यक आहे. कारण, बहुधा कित्येक नागरिकांना याबद्दल हेलपाटे मारण्याची वेळ येत आहे. तहसील कार्यालयात कागदपत्रांसाठी रांगा लागल्या आहेत. वेळेतच कागदपत्रे कशी मिळतील, यासाठी पालकांची शर्यत लागली आहे. काही पालकांनी कागदपत्रे जुळवाजुळव करण्यासाठी कामावरून सुट्या टाकल्या आहेत, तर काही पालक ठरलेल्या वेळेत कागदपत्रे तयार करून मिळत नसल्याने संताप व्यक्त करीत आहे. उत्पन्नाचा व रहिवासी दाखला सात दिवसांच्या आत मिळणे बंधनकारक आहे, तर जात प्रमाणपत्र हे १५ दिवसांच्या आत मिळणे आवश्यक आहे. यासाठी पालकांचा खटाटोप सुरू आहे. मात्र, तहसील कार्यालयात यासाठी मनुष्यबळ अपुरे पडत आहे. नायब तहसीलदार ज्योती जाधव व काही कर्मचाऱ्यांच्या टेबलाभोवती नागरिक गराडा घालून बसले आहेत, तर काही नागरिक कागदपत्रे वेळेत पूर्तता करूनही मिळत नसल्याने नायब तहसीलदार यांच्याकडे विनवण्या करीत आहेत. मात्र, तहसील कार्यालयात कागदपत्रे पाहणीसाठी कर्मचाऱ्यांचीही चांगलीच तारांबळ उडत आहे. (प्रतिनिधी)