पुणे : बंगालच्या उपसागरात अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डीप डिप्रेशन) निर्माण झाले असून, त्याची तीव्रता वाढत आहे. त्याचे रूपांतर चक्रीवादळात होणार आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांत महाराष्ट्रासह मध्य भारतात उष्णतेची लाट तीव्र होईल, असा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. याशिवाय आनंदाची बातमी म्हणजे मोसमी पाऊस (मान्सून) निकोबार बेट आणि बंगालच्या उपसागरात बुधवारी दाखल झाला. बंगालच्या उपसागरात रविवारी हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि त्याची तीव्रता वाढत गेली व मंगळवारी त्याचे रूपांतर अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले. याची तीव्रता वाढत आहे. अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे पुढील टप्प्यात चक्रीवादळात रूपांतर होते. त्यानुसार या क्षेत्राचेही रूपांतर चक्रीवादळात होणार आहे. हे क्षेत्र चेन्नईकडे सरकत असून, वाऱ्याचा वेग ताशी १० कि.मी एवढा आहे. तीन-चार दिवसांत हे वादळ चेन्नईच्या किनापट्टीवर धडकण्याचा अंदाज आहे.
चक्रीवादळामुळे ४८ तास जिकिरीचे
By admin | Updated: May 19, 2016 06:18 IST