शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

१६ लाख जनावरांची भूक निसर्गावर

By admin | Updated: July 7, 2014 22:28 IST

पश्‍चिम वर्‍हाडावर चारा टंचाईचे संकट

मेहकर : पश्‍चिम वर्‍हाडावर चारा टंचाईचे संकट घोंघावत असून, त्यामुळे पशूपालक अडचणीत आले आहेत. पश्‍चिम वर्‍हाडात जवळपास १६ लाख गुरं-ढोरं असून, जेमतेम जुलैअखेरपर्यंत पुरेल एवढाच चारा शिल्लक असल्याने, त्यानंतर या मुक्या जिवांचे पोट निसर्गावर अंबलंबून राहणार आहे. पावसाअभावी पश्‍चिम वर्‍हाडातील अकोला, वाशिम आणि बुलडाणा या तिन्ही जिलंवर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. या दुष्काळाच्या झळा आता मुक्या जनावरांनाही सोसाव्या लागत आहेत. राना-वनात जनावरांसाठी चारा फारसा राहिलेला नाही. त्यामुळे चार्‍यासाठी जनावरांची, तर पशुधन वाचविण्यासाठी शेतकर्‍यांची भटकंती सुरू आहे. पश्‍चिम वर्‍हाडात एकूण १५ लाख ९५ हजार ९१६ जनावरे आहेत. त्यापैकी अकोला जिलत २ लाख ७७ हजार ८८१ आणि वाशिम जिलत ३ लाख ४ हजार ३४७ जनावरे आहेत. बुलडाणा जिलत मेंढय़ा १ लाख २९ हजार ८३९, शेळ्या २ लाख ६७ हजार ४५१ व इतर जनावरे ६ लाख १६ हजार ३९८ आहेत. एकट्या बुलडाणा जिल्ह्यात एकूण १0 लाख १३ हजार ६८८ एवढे पशुधन आहे. वाशिम जिलत २ लाख ४१ हजार ८६२ मोठी जनावरे असून, ६२ हजार ७८१ लहान जनावरे आहेत. मोठय़ा जनावरांना दिवसाकाठी सुमारे ७ किलो कोरडा चारा लागतो. छोट्या जनावरांना जवळपास ३ किलो कोरडा चारा दिवसाकाठी लागतो. पश्‍चिम वर्‍हाडात जेमतेम जुलै अखेरपर्यंत पुरेल, एवढाच चारा उपलब्ध आहे. साठवून ठेवलेला चारा संपल्याने पशुपालक मिळेल त्या भावात चारा खरेदी करीत आहेत. मार्च महिन्यात गारपिट व अवकाळी पाऊस झाल्याने, चार्‍याची मोठय़ा प्रमाणात नासाडी झाली होती. त्यामुळे चार्‍याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. जुलै अखेरपर्यंत दमदार पाऊस न झाल्यास, पश्‍चिम वर्‍हाडात चारा विकत मिळणेही अवघड होणार आहे. या चारा टंचाईमुळे पश्‍चिम वर्‍हाडातील १५ लाख ९५ हजार ९१६ जनावरांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यासाठी अशी वेळ येण्या आधी प्रशासनाने पुर्व तयारी करण्याची गरज आहे. **दुधाळ जनावरंही धोक्यातअनेक शेतकर्‍यांजवळ दूध देणार्‍या गायी, म्हशी असल्याने या जनावरांना हिरवा चारा आवश्यक असतो; परंतू पाणीच नसल्याने हिरवा चारा मिळणे अवघड झाले आहे. दुधाळ जनावरांना हिरवा चारा न मिळाल्यास दुधाचाही तुटवडा निर्माण होईल.