शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खंडाळ्याजवळ हुबळी एक्स्प्रेसवर कोसळली दरड, काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 11:39 IST

खंडाळ्याजवळ हुबळी एक्स्प्रेसवर दरड कोसळल्याचे वृत्त समोर आले आहे. पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास मंकी हिलजवळ ही दुर्घटना घडली आहे.

लोणावळा, दि. 21 - मुंबई-पुणे रेल्वे मार्गात पुन्हा विघ्न आले आहे. खंडाळ्याजवळ हुबळी एक्स्प्रेसवर दरड कोसळल्याचे वृत्त समोर आले आहे. पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास मंकी हिलजवळ ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. दरम्यान, अपघातानंतर हुबळी एक्स्प्रेस एक तास उशिरानं धावत आहे. मुंबई-पुणे लोहमार्गावरुन मुंबईच्या दिशेने निघालेल्या हुबळी एक्स्प्रेसवर खंडाळा व कर्जत दरम्यान मंकी हिलजवळ दरड कोसळली आहे.     

मिळालेल्या माहितीनुसार, हुबळी एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने रवाना होत असताना  पहाटे 5.30- 6 वाजण्याच्या सुमारास मंकी हिलजवळील डोंगरावरुन दरड एक्स्प्रेसवर कोसळली. यावेळी भीषण असा आवाज झाल्याने प्रवाशांमध्ये भीती पसरली. यावेळी रेल्वे कर्मचा-यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर दरड हटवण्याचे काम सुरू केले व काही वेळाने हुबळी एक्स्प्रेस आपल्या मार्गाकडे रवाना करण्यात आली. दरम्यान, जखमी प्रवाशांवर  कर्जत येथील रेल्वे दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आले.

जुलै महिन्यातही मंकी हिलजवळ रेल्वे रुळावर कोसळली होती दरडलोणावळ्यातील मंकी हिलजवळ जुलै महिन्यातही डोंगरावरून रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतूक खोळबंली होती. यावेळी रेल्वेतीलच प्रवाशांनी तत्परता दाखवत ट्रॅकवरील दगड बाजूला केले व रेल्वे वाहतूक पूर्ववत झाली होती. ट्रॅकवर दगड पडल्याचे दिसताच पुण्याहून मुंबईकडे निघालेल्या सिंहगड एक्सप्रेसच्या चालकाने गाडी तत्काळ थांबवली होती. या गाडीतील प्रवाशांनीही ट्रॅकवरील दगड बाजूला करून एक्स्प्रेसचा मार्ग मोकळा केला. सुदैवानं रेल्वेचा वेग कमी असल्यामुळे कोणती जीवितहानी झाली नव्हती. पण याचा लांब पल्ल्याच्या गाड्यांना फटका बसला होता. गेल्या काही दिवसांपासून लोणावळा परिसरात पावसाची रिमझिम सुरू आहे. मंकी हिल येथून रेल्वे ट्रॅक जातो. पावसामुळे दरड रेल्वे ट्रॅकवर कोसळून दुर्घटना घडत आहेत. 

18 जुलै 2017 : मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेसचं घसरलं होते इंजिन  जुलै महिन्यातच खंडाळा घाटात मंकी हिलजवळ मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरुन घसरले होते. सुदैवाने यावेळी मोठी दुर्घटना टळली होती.  मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनिल उदासी यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार एक मोठा दगड घसरून रुळावर आला, तो इंजिनाला लागला आणि त्यामुळे इंजिनाचे चाक घसरले.