बारावीच्या विद्यार्थ्यांना आज गुणपत्रिका मिळणारमुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना मंगळवारी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये दुपारी ३ वाजल्यापासून गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे. बारावी परीक्षेचा निकाल मंडळाने २ जून रोजी संकेतस्थळावर जाहीर केला होता.राज्यभरातून ११ लाख ९८ हजार ८५९ विद्यार्थी बसले होते. तर मुंबई विभागातून २ लाख ८७ हजार ८१४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २ लाख ५४ हजार १३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून मुंबई विभागाचा एकूण निकाल ८८.३0 टक्के लागला आहे. मुंबई विभागातून परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना मंगळवारी संबंधित महाविद्यालयात गुणपत्रिका मिळणार आहेत. सकाळी मंडळामध्ये महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल. त्यानंतर दुपारी महाविद्यालये विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देणार आहेत.पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांची यादी रोखलीबारावी परीक्षेत विविध विषयांमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांना खासगी व्यक्ती, संस्थांकडून पारितोषिके देण्यात येतात. याची यादी मंडळाने तयार केली आहे. परंतू परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनीही गुणपडताळीसाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे राज्य मंडळाने पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांची यादी काही दिवसांसाठी रोखण्यात असल्याचे, मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पांडे यांनी सांगितले.
बारावीच्या विद्यार्थ्यांना आज गुणपत्रिका मिळणार
By admin | Updated: June 10, 2014 00:54 IST