शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

बारावी निकाल : राज्यात पुणे विभाग पाचव्या स्थानावर

By admin | Updated: June 2, 2014 22:32 IST

बारावी परीक्षेच्या निकालात राज्यातील एकुण नऊ विभागीय शिक्षण मंडळांमध्ये पुणे विभाग पाचव्या स्थानावर आहे.

पुणे : बारावी परीक्षेच्या निकालात राज्यातील एकुण नऊ विभागीय शिक्षण मंडळांमध्ये पुणे विभाग पाचव्या स्थानावर आहे. विभागाचा निकाल ९०.७३ टक्के लागला असून अहमदनगर जिल्हा आघाडीवर आहे. राज्याप्रमाणेच पुणे विभागातही मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. यावर्षी पुणे विभागाचा निकालही राज्याप्रमाणे सर्वाधिक लागला आहे.पुणे विभागातून बारावी परीक्षेसाठी एकुण २ लाख २ हजार ८३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख २ हजार ५१० जणांनी परीक्षा दिली. तर १ लाख ८३ हजार ७३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तार्णतेची टक्केवारी ९०.७३ एवढी आहे. राज्यातील निकालामध्ये अनुक्रमे कोकण, अमरावती, कोल्हापूर व औरंगाबाद या विभागापाठोपाठ पुणे विभागाचा क्रमांक आहे. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा विभागाचा निकाल ३१.१९ टक्के इतका लागला आहे. विभागात १ लाख १४ हजार ६०५ मुलांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १ लाख ४५० मुले उत्तीर्ण झाली असून उत्तीर्णतेचे प्रमाण ८७.६५ टक्के एवढे आहे. मुलींमध्ये उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.७४ टक्के आहे. परीक्षा दिलेल्या ८७ हजार ९०५ मुलींपैकी ८३ हजार २८१ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. पुणे विभागात अहमदनगर जिल्ह्याचा सर्वाधिक ९२.५८ टक्के निकाल लागला आहे. त्यापाठोपाठ पुणे जिल्हा ९०.४९ आणि सोलापूर जिल्ह्याचा निकाल ८९.०२ टक्के इतका लागला आहे. मुलींंच्या उत्तीर्णतेचे प्रमाणही अहमदनगर जिल्ह्यात जास्त आहे. शाखानिहाय निकालामध्ये पुणे विभागात विज्ञान शाखेचा निकाल ९४.४८ टक्के, कला शाखेचा ८५.३१ टक्के, वाणिज्य शाखेचा ९१.०२ तर एमसीव्हीसीचा ९१.३४ टक्के निकाल आहे. जिल्हानिहाय निकालाची टक्केवारीजिल्हाटक्केवारीपुणे

मुले८७.२८मुली९४.२८एकुण९०.४९अहमदनगर

मुले८९.९४मुली९६.३५एकुण९२.५८सोलापूर

मुले८५.६८मुली९३.९८एकुण८९.०२पुणे विभागाची मागील सात वर्षाच्या निकालाची टक्केवारीवर्षटक्केवारी२०१४९०.७३२०१३७५.७७२०१२७५.७४२०११७३.५९२०१०७७.२०२००९८१.८५२००८८९.७२२००७७१.०९