शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बारावीचा पहिला पेपर सुरळीत

By admin | Updated: March 1, 2017 02:41 IST

विद्यार्थी जीवनातील टर्निंग पॉइंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारावी बोर्डाच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली.

नवी मुंबई : विद्यार्थी जीवनातील टर्निंग पॉइंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारावी बोर्डाच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली. पहिला दिवस सुरळीतपणे पार पडला असून, मुंबई विभागातील ५५७ केंद्रावर ३ लाख ४० हजार ४०८ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे, तर ठाणे जिल्ह्यातील १४८ केंद्रावर ९६ हजार १८१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी सात भरारी पथके व दक्षता समिती नेमण्यात आली असून, यामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारऱ्यांचे एक पथक, दुसरे उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, तिसरे शिक्षणाधिकारी प्राथमिक, डायट प्राचार्य यांचे चौथे पथक, शिक्षणाधिकारी निरंतर शिक्षण अधिकारी यांचे पाचवे पथक, तर सहावे महिलांच्या आणि सातवे बोर्डाच्या पथकाचा यात समावेश आहे. परीक्षा केंद्रापासून १०० मीटरच्या आत प्रतिबंधित क्षेत्र व या क्षेत्रातील झेरॉक्स केंद्रे बंद ठेवण्यात आली होती. कोणत्याही परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये यासाठी तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी, मुख्याधिकारी यांनी विशेष लक्ष ठेवले होते. इंग्रजीचा पेपर असल्याने परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. परीक्षेच्या अर्धा तास आधीच विद्यार्थ्यांबरोबरच पालकही या ठिकाणी उपस्थित होते. यावर्षी विद्यार्थी संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने ज्या केंद्रांवर आसन व्यवस्थेत अडचणी आल्या, अशा केंद्रानी शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीने शेजारील इमारतीमध्ये बैठक व्यवस्था केली होती. बुधवारी ११ ते २ या वेळेत हिंदीचा पेपर होणार असून १ लाख २४ हजार ६६ विद्यार्थी हिंदीचा पेपर देणार आहेत. विद्यार्थी तसेच पर्यवेक्षक मोबाइल वापरास बंदी करण्यात आल्याने ज्यांच्याकडे मोबाइल फोन आढळले, अशा विद्यार्थ्यांचे फोन जमा करण्यात आले होते. परीक्षा केंद्रावरील केंद्रसंचालकांशिवाय इतरांना मोबाइल फोनचा वापर करण्यास बंदी करण्यात आली होती. परीक्षा केंद्रावर दिव्यांगाकरिता विशेष सोय करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका विशेष कस्टडीत जमा केल्या जाणार आहेत. परीक्षा केंद्राबाहेरील गेटवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, शहरातील कोणत्याही केंद्रावर गैरप्रकार न घडल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. वेळेचे पालन चोखपणे करण्यात आल्याचेही या वेळी स्पष्ट करण्यात आले. (प्रतिनिधी)