शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून बारावीची परीक्षा, राज्यातून १५ लाख विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 06:14 IST

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या इयत्ता बारावीची लेखी परीक्षा बुधवारपासून सुरू होत आहे

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या इयत्ता बारावीची लेखी परीक्षा बुधवारपासून सुरू होत आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरून प्रश्नपत्रिका फोडण्याच्या प्रकारांना चाप लावण्यासाठी प्रत्येक वर्गातील प्रश्नपत्रिकांचे सीलबंद पाकीट विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर उशिरा येणाºया कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही, त्यामुळे वेळेच्या अर्धा तास अगोदर विद्यार्थ्यांनी वर्गात हजर राहावे, असेआवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे.प्रश्नपत्रिका ज्या वेळी मंडळाकडून केंद्रप्रमुखांकडे हस्तांतरित केल्या जातात, त्या दरम्यानच्या १५ ते २० मिनिटांच्या कालावधीत काही ठिकाणी पेपर फुटल्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे मंडळाने यंदा प्रत्येकी २५ प्रश्नपत्रिकांची सीलबंद पाकिटे तयार करून ती विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीनेच उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअ‍ॅपवरून प्रश्नपत्रिका फोडण्यात सहभागी असलेले विद्यार्थी परीक्षा देण्यास उशिरा आल्याचे चौकशीत स्पष्ट झाले होते. त्यामुळे उशिरा येणाºया विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश न देण्याचा निर्णय समितीकडून घेण्यात आला आहे. राज्यातील केंद्रांवर मोबाइल जॅमर बसवावेत, असा प्रस्ताव मागील वर्षी विचाराधीन होता. त्याबाबत यंदा निर्णय झालेला नाही.राज्य मंडळाकडून यंदा काही व्यावसायिक अभ्यासक्रम निवडण्याची विद्यार्थ्यांना मुभा दिली होती. मात्र केवळ १५८ विद्यार्थ्यांनी व्यवसाय शिक्षणाचे विषय परीक्षेसाठी निवडले आहेत.१४ लाखांवर परीक्षार्थीबारावी परीक्षेला राज्याच्या ९ विभागांमधून १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थी बसले आहेत. राज्यभरातील २ हजार ८२२ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, त्यासाठी ९ हजार ४८६ कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केल्याची माहिती राज्य मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली.‘कॉपी’साठी २५२ पथकेकॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळाकडून प्रत्येक जिल्ह्यासाठी ७ याप्रमाणे २५२ भरारी पथके नेमली आहेत. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :examपरीक्षा