शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक मदत वाटपाचे शिवधनुष्य सरकार कसे पेलणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 09:01 IST

महापुरात नागरिक, व्यावसायिकांचे दस्तऐवज गहाळ

- आविष्कार देसाईरायगड : महाडमधील पूर परिस्थितीचे पंचनामे पूर्ण करण्याचे साेपस्कार जिल्हा प्रशासनाने पूर्ण केले आहेत. मात्र आता सर्वसामान्य महाडकरांना प्रतीक्षा आहे, ती नुकसानभरपाईची. बहुतांश नागरिकांची विविध महत्त्वाची कागदपत्रे, पुरावे, एटीएम कार्ड असे दस्तऐवज खराब झाले आहेत, तर काहींचे पुरात वाहून गेले आहेत. त्यामुळे बँक खात्यांमध्ये आर्थिक मदत जमा करताना याेग्य लाभार्थ्यांची निवड करण्याचे शिवधनुष्य सरकार आणि प्रशासनाला पेलावे लागणार आहे.२२ आणि २३ जुलै राेजी आलेल्या महापुराने कधी नव्हे तेवढे आर्थिक नुकसान केले आहे. घरांमध्ये, दुकानांमध्ये, रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे आणि घाणीचे साम्राज्य पसरले. येथील स्वच्छता करण्यासाठी लाखाे हात पुढे आले आहेत. पुराचे पाणी सुमारे १५ फुटांपर्यंत असल्याने घरातील सर्व वस्तू, टीव्ही, फ्रीज, संगणक, लॅपटाॅप, माेबाइल, राेख रक्कम, साेफा, भांडी, महत्त्वाची कागदपत्रे, बँक पासबुक, एटीएम यासह अन्य नुकसान झाले आहे. तसेच व्यावसायिकांचा सर्व माल भिजून मातीमाेल झाला आहे. सरकारी कार्यालये, बँका,  न्यायालय अशा सर्व यंत्रणांची कागदपत्रे भिजून खराब झाली आहेत. सुमारे एक काेटी रुपयांच्या चलनी नाेटाही भिजल्या आहेत.विमा कंपन्यांकडून तांत्रिक मुद्यांवर बाेटकाहींनी विमा काढलेला आहे, मात्र विमा काढण्याआधी मधाळ बाेलणाऱ्या याच कंपन्या आता आपल्या ग्राहकांवर डाेळे वटारत आहेत. विमा कंपन्या मात्र तांत्रिक मुद्यांवर बाेट ठेवत असल्याने व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.आर्थिक अफरातफर होण्याचा धोकासरकार जी आर्थिक मदत करते ती लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करण्याची अलीकडे पद्धत आहे. त्यामुळे या वेळी प्रचंड अडचण निर्माण हाेणार आहे. थेट लाभार्थ्यांच्या हातात मदत टेकवायची झाल्यास आर्थिक अफरातफर हाेण्याचाही धाेका आहे.मदत वाटपाचे व्यवस्थापन ठरतेय कुचकामीसुरुवातीला अन्न-धान्य, पिण्याचे पाणी यासह अन्य मदतीचा ओघ महाडकडे आला हाेता. परंतु मदत घेऊन येणारी वाहने वाटेतच अडवून रिकामी केली जात हाेती. मदत घेऊन येणारेदेखील या प्रकारामुळे चक्रावून गेले हाेते. मदत वाटपाचे व्यवस्थापन यामुळे कुचकामी तर ठरले नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे.

टॅग्स :chiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाfloodपूर