शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

सहा कोटी खर्च कसे करणार ?

By admin | Updated: February 2, 2015 01:12 IST

जानेवारीच्या शेवटच्या टप्प्यात मिळालेला अतिरिक्त विकास निधी खर्च करण्यास फक्त दोन महिन्याचा अवधी शिल्लक असल्याने, त्याचे नियोजन करताना आमदार आणि संबंधित सरकारी यंत्रणेवरही ताण आलेला आहे.

आमदारांचा अतिरिक्त विकास निधी : नियोजनासाठी फक्त दोन महिनेनागपूर : जानेवारीच्या शेवटच्या टप्प्यात मिळालेला अतिरिक्त विकास निधी खर्च करण्यास फक्त दोन महिन्याचा अवधी शिल्लक असल्याने, त्याचे नियोजन करताना आमदार आणि संबंधित सरकारी यंत्रणेवरही ताण आलेला आहे.विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तत्कालीन आमदारांनी त्यांना मिळालेला दोन कोटी रुपयांचा विकास निधी पूर्ण खर्च केल्याने, नव्याने निवडून आलेल्या आमदारांसाठी विकास निधी शिल्लक नव्हता. त्यामुळे त्यांनी केलेल्या आग्रही मागणीचा विचार करून, शासनाने प्रत्येक आमदारासाठी विशेष बाब म्हणून जानेवारी महिन्याच्या अंतिम टप्प्यात ५० लाख रुपये मंजूर केले. नागपूर जिल्ह्यात १२ आमदार आहेत व त्यांना प्रत्येकी ५० लाख रुपये याप्रमाणे नागपूर जिल्ह्याला सहा कोटी रुपये प्राप्त होणार आहे. जिल्हा नियोजन विभागामार्फत प्रस्ताव पाठवून, हा निधी आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी म्हणजे मार्चपर्यंत खर्च करायचा आहे.२०१४ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तत्कालीन आमदारांनी त्यांच्या वाट्याच्या विकास निधीचे प्रस्ताव जिल्हा नियोजन विभागाकडे दिले व त्याची कामे अजून सुरूच आहेत. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांची तर काही ठिकाणी अद्याप कामेही सुरू झाली नाहीत. आता नव्याने आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील ५० लाखांचे विविध कामांचे प्रस्ताव टप्प्याटप्प्याने जिल्हा नियोजन विभागाकडे सादर करणे सुरू केले आहे. आता अतिरिक्त निधीचे प्रस्ताव सादर करणे, त्याला मंजुरी मिळणे, तो संबंधित विभागाकडे पाठविणे, निविदा काढून कामाचे कार्यादेश देणे ही वेळखाऊ प्रक्रिया आहे, हे येथे उल्लेखनीय.सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे, असे शासनाकडून सांगितले जाते. शेतकऱ्यांच्या मदत वाटपावरही निधीच्या तुटवड्यामुळे परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर आमदारांना अतिरिक्त निधी देण्याची खरंच गरज होती काय? असाही सवाल शेतकरी नेते करीत आहेत. (प्रतिनिधी)