शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या उलटया बोंबा,काळ्या यादीतील ठेकेदारांना कंत्राट कसे

By admin | Updated: July 7, 2016 19:47 IST

उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेने आज युटर्न घेत काळ्या यादीतील ठेकेदारांना पुलांचे कंत्राट दिल्याप्रकरणी प्रशासनालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले़ घोटाळेबाज ठेकेदारांवर कारवाई

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ७ : उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेने आज युटर्न घेत काळ्या यादीतील ठेकेदारांना पुलांचे कंत्राट दिल्याप्रकरणी प्रशासनालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले़ घोटाळेबाज ठेकेदारांवर कारवाई सुरु असतानाच चार पुलांचे काम स्थायी समितीने त्यांना दिले़ मात्र या ठेकेदारांची शिफारस आलीच कशी, अशा उलट्या बोंबा मारण्यास शिवसेनेने आता सुरुवात केली आहे़मुंबईतील ३४ रस्त्यांची तपासणी केली असता या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली़ ३५२ कोटी रुपयांच्या या घोटाळ्याप्रकरणी थर्ड पार्टी आॅडिट कंपनी आणि सहा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई सुरु झाली़ त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात आला़ तरीही घोटाळेबाज सहा ठेकेदारांना यादरम्यान चार पुलांचे कंत्राट मिळाले़हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले़ याची गंभीर दखल घेत न्यायालयाने पालिका प्रशासनाबरोबरच स्थायी समितीलाही चांगलेच झापले़ रस्ते घोटाळा उघड केल्याचे श्रेय यापूर्वीच भाजपा घेऊन झाल्याने शिवसेनाच यामुळे अडचणीत येणार आहे़ याचा साक्षात्कार झाल्याने काळ्या यादीतील ठेकेदारांना कंत्राट मिळतेच कसे, असा सवाल सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी पालिकेच्या महासभेत आज केला़ प्रतिनिधीचौकटविरोधी पक्षांचा सभात्यागघोटाळेबाज ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरु असताना मुंबईतील चार पुलांच्या बांधकामांचे कंत्राट तयार होत होते़ त्यामुळे ही प्रक्रिया दोन महिने लांबणीवर टाकत पुलांचे कंत्राट मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात येते़ याबाबत विरोधी पक्षांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांना आज जाब विचारला़ मात्र त्यांनी कोणतेही ठोस उत्तर न दिल्यामुळे विरोधी पक्षांनी सभा तहकुबी मांडली़ यास सत्ताधाऱ्यांनी विरोध केल्यामुळे विरोधी पक्षांनी सभात्याग केला़विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना घेरलेरस्ते घोटाळ्याप्रकरणी विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना आज घेरले़ काँग्रेसच्या नगरसेवकांनी मोठमोठे फलक झळकवून घोषणाबाजी केल्या़ सेना भाजपा भ्रष्टाचाराची युती, शिवसेनेमुळे मुंबई खड्ड्यात अशी निदर्शने करण्यात आली़प्रशासनाची सावध भूमिकारस्ते घोटाळाप्रकरणात दक्षता खात्याचे उदय मुरुडकर आणि रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता अशोक पवार या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई सुरु आहे, असे आयुक्तांनी पालिका महासभेपुढे स्पष्ट केले़ मात्र ठेकेदारांवरील कारवाईबद्दल बोलणे त्यांनी टाळले़३५२ कोटी रुपयांचा घोटाळा साडेसात हजार कोटी रुपये खर्च करुन काँक्रिटचे रस्ते तयार करण्यात येत आहेत़ मात्र ३४ रस्त्यांच्या चौकशीत सरासरी ३८ ते १०० टक्के अनियमितता आढळून आली़ असा ठपकाच पालिकेच्या चौकशी समितीने ठेवला़ सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे़ २०१३ ते २०१५ मध्ये दुरुस्त करण्यात आलेल्या रस्त्यांची चौकशी यात होणार आहे़या ठेकेदारांची मक्तेदारी चौकशीच्या पहिल्या टप्प्यात दोषी ठरलेले ठेकेदार के़आऱ कन्स्ट्रक्शन, महावीर इन्फ्रा, आरपीएस, आऱ के़ मदानी, जे़ कुमार, रेलकॉन यांना काळ्या यादीत टाकणे, नोंदणी रद्द करणे व त्यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आले़ मात्र यातील काहींना पुलाचे कंत्राट तर जे़ कुमारला मेट्रो प्रकल्प तीनचे कंत्राट मिळाले आहे़या पुलांचे काम रखडलेहँकॉक पूल, मिठी नदीवरील पूल, यारी रोडच्या जंक्शनवर वाहतूक पूल, लोखंडवाला कॉम्पलेक्स मागचा रस्ता रुंदीकरण आणि विक्रोळी रेल्वे स्टेशनपासून आरओबीचे कंत्राट देण्यात आले. या कामासाठी आता नव्याने निविदा मागविण्यात येणार आहे