शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीस 'E-Office' मधून कसं चालवतात सरकार?; बावनकुळेंनी थोडक्यात सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 14:45 IST

१ तासाच्या प्रवासात देवेंद्र फडणवीस चारदा मोबाईल बघून राज्यात काय सुरू आहे याची माहिती घेतात असं बावनकुळे म्हणाले.

मुंबई - मुख्यमंत्र्‍यांनी सरकार वाऱ्यावर सोडलं आहे. त्यांचे दौरेच सुरू असतात असा आरोप विरोधकांकडून केला जात होता. त्यावरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीस ई ऑफिसमधून उत्तम प्रकारे प्रशासन चालवतात. महाराष्ट्राचा विकास आणि इतर राज्याचा विकास विरोधकांनी बघितला पाहिजे. राज्याने कोणकोणत्या यशस्वी योजना दिल्यात हे पाहिले पाहिजे. देवेंद्र फडणवीस सरकार देशात सर्वोकृष्ट कामकाज करतंय असं त्यांनी म्हटलं.

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासातलं १४-१९ या काळापेक्षा अधिक उत्तम आणि १०० पट जास्त काम करणारं सरकार देवेंद्र फडणवीस करतायेत. ते या राज्याला मोदींच्या संकल्पनेला शोभणारं काम करतायेत. देवेंद्र फडणवीस २४ तास ३६५ दिवस शासनाकडे लक्ष ठेवून आहेत. त्यांचा पूर्ण वेळ, एक एक मिनिटे आदेश पारित करण्यासाठी राहतो. त्यांचा मोबाईल जनतेसाठी आणि शासनासाठी उपलब्ध आहे. आजही ३-४ निर्णय त्यांनी तात्काळ मोबाईलवरून आणि त्यांच्या ई ऑफिसमधून घेतले आहेत. देवेंद्र फडणवीस ई ऑफिस चालवतायेत. त्यातूनही राज्य चालवता येते असं बावनकुळेंनी सांगितले. 

तसेच दावोस दौऱ्यावर असतानाही फडणवीसांनी ई ऑफिसमधून काम केले. आता दिल्लीतून ते काम करतायेत. कुठलाही शासन निर्णय अडत नाही. शासनाचे काम थांबत नाही. १ तासाच्या प्रवासात देवेंद्र फडणवीस चारदा मोबाईल बघून राज्यात काय सुरू आहे. कोणत्या शासन आदेशाची गरज आहे ते ई ऑफिसमधून पाहतात असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं.

सुप्रियाताईंनी राज्याची बदनामी करू नये 

दरम्यान, सुप्रिया सुळेंनी अभ्यास केला पाहिजे. इतर राज्याची तुलना महाराष्ट्राशी करू नये. महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राची बदनामी करू नये. महाराष्ट्राचा विकास आणि इतर राज्याचा विकास त्यांनी पाहिला पाहिजे. महाराष्ट्राने काय काय योजना दिल्यात, यशस्वीरित्या पोहचवल्यात ते पाहिले पाहिजे. नीती आयोगाचा कुठल्या वर्षाचा आकडा आहे माहिती नाही. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकार देशात सर्वोकृष्ट कामगिरी करतंय. सुप्रिया सुळेंनी राज्याची बदनामी करू नये असा टोला बावनकुळेंनी लगावला. 

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSupriya Suleसुप्रिया सुळे