शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

Navneet Rana Troll: रुग्णालयातील MRI कक्षात कॅमेरा पोहोचलाच कसा? नवनीत राणा ‘ट्रोल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 07:26 IST

फोटो व्हायरल होताच खासदार नवनीत राणा ‘ट्रोल’

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना जामीन मिळाल्यापासून त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. छाती, मान आणि शरीराच्या अन्य भागात वेदना तसेच स्पॉन्डिलिसिसचा त्रास होत असल्याने शनिवारी त्यांचे एमआरआय स्कॅन करण्यात आले. तथापि, एमआरआय स्कॅन करतेवेळीचे त्यांचे फोटो समोर आल्यामुळे मात्र त्यांना सोशल मीडियावर प्रचंड टीकेचा सामना करावा लागत आहे. नवनीत राणा यांच्या कार्यालयानेच हे फोटो शेअर केल्यामुळे त्या ट्रोल झाल्यात.

वास्तविक, एमआरआय स्कॅनिंग रुममध्ये रुग्णाशिवाय अन्य कोणाला परवानगी नाही, महत्त्वाचे म्हणजे कॅमेरा, मोबाइल अशा इलेक्ट्रॉनिक उपरकरणांनाही मनाई असते. अशात, वृत्तसंस्था एएनआयने राणा यांचे एमआरआय करतेवेळीचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले. तसेच हे फोटो खासदाराच्या कार्यालयाकडून शेअर केल्याचेही वृत्तसंस्थेने स्पष्ट केले. यावरून नेटकऱ्यांनी राणा यांना धारेवर धरले. तसेच लीलावती हॉस्पिटलही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे.

नर्सच्या जागी कॅमेरामन बसवलाय का?‘एमआरआय कक्षात मोबाइल किंवा कॅमेरा कसा पोहोचतो?, हॉस्पिटलमध्ये नर्सच्या जागी कॅमेरामन बसवलाय वाटतं, हे सुरक्षा मानकांचे उल्लंघन नाही का? लीलावती हॉस्पिटल लॅबच्या आतमध्येही फोटो काढण्यास परवानगी देते का?’ अशा प्रश्नांची सरबत्तीच नेटकऱ्यांकडून होत आहे. #ड्रामाअलर्ट, #नौटंकी,  #नौटंकीबाज, #बंटीबबली असे हॅशटॅग्स वापरत नेटकरी, ‘तुम्ही जर एमआरआय मशीनपर्यंत कॅमेरा घेऊन जात असाल आणि चेहरा कॅमेऱ्यात यावा यासाठी धडपड करीत असाल तर तुमची नाटकं फक्त प्रसिद्धीसाठी चालू आहे, असे अनेक ट्विट आणि पोस्टस् करीत राणा यांच्यावर टीकेचा भडिमार करीत आहेत. 

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणा