शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

वास्तव्याच्या पुराव्याशिवायही आधारवरील पत्ता बदलू शकता...जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 14:49 IST

सर्वांसाठी गरजेचे झालेल्या आधार कार्डसाठी आता नवीन बदल झाला आहे.

मुंबई : नवीन वर्षाची सुरुवात नव्याने बदललेल्या नियमांनी झाली आहे. काही नियम माहिती आहेत, मात्र काही नियमांबाबत आपण अनभिज्ञ आहोत. सर्वांसाठी गरजेचे झालेल्या आधार कार्डसाठी आता नवीन नियम आला आहे. ज्यामुळे सतत नोकरीनिमित्त शहरे किंवा भाड्याची घरे बदलणाऱ्या लोकांना फायदा होणार आहे. त्यांना निवासी पुरावा नसला तरीही आधारवरील पत्ता बदलता येणार आहे.

सध्या युआयडीएआयने प्राथमिक स्वरुपात या सेवेची सुरुवात केली आहे. यासोबतच जर जन्म दिनांकामध्ये बदल करायचा असेल तर 1 जानेवारीपासून जवळच्या आधार केंद्रावर जाऊन बदलू शकता. मात्र, दुसऱ्यांदा जन्म दिनांकामध्ये बदल करायचा असल्यास आधारच्या क्षेत्रिय कार्यालयाकडे जावे लागणार आहे. 

पत्ता कसा अपडेट कराल...

  1. युनिक आयडेंटीफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या uidai.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल. 
  2. येथे गेल्यानंतर आधार अपडेट सेक्शनमध्ये Address Update Request (Online) वर क्लिक करावे लागेल. 
  3. आता नवीन पेज ओपन होईल. यामध्ये  Update Address आणि Request for Address Validation Letter नावाचा पर्याय दिसेल. यापैकी Address Validation Letter वर क्लिक करावे. 
  4. यानंतर पुढील पेजवर आधार क्रमांक टाकावा. खाली कॅप्चा कोड असेल. तो टाकल्यानंतर सेंड ओटीपी किंवा एन्टर ओटीपी वटनावर क्लिक करावे. या पासवर्ड तुमच्या आधारकडे नोंद असलेल्या मोबाईलवर येईल.
  5. हा ओटीपी वेबसाईटवर टाकल्यानंतर लॉगईनवर क्लिक करा. 
  6. यानंतर तुम्हाला ओळखणाऱ्याचा (व्हेरिफायर) आधार नंबर टाकून सबमिट बटन दाबावे. (टीप : तुम्हाला जो पत्ता बदलायचा आहे तो ओळखणाऱ्या व्यक्तीच्या आधारवरील पत्ता असावा.)
  7. हा टप्पा पार केल्यानंतर तुम्हाला सर्विस रिक्वेस्ट नंबर दिला जातो. हा नंबर नोंद करून ठेवावा. 
  8. या सोबतच व्हेरिफायरच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी आणि लिंक पाठविण्यात येईल. 
  9. या लिंकवर व्हेरिफायरने जाऊन ओटीपी टाकत तुम्हाला परवानगी द्यावी लागेल. यानंतर तुम्हाला या संबंधीचा मेसेज मिळेल.
  10. हा मेसेज आल्यानंतर तुम्हाला तीन टप्प्यांमध्ये पत्ता टाकून Update Address बटनावर क्लिक करावे लागेल. यासाठी सर्विस रिक्वेस्ट नंबर किंवा आधार नंबर आणि नव्याने आलेला ओटीपी टाकून लॉगईन करावे लागणार आहे. 
  11. लॉगइन केल्यानंतर तुम्ही नवीन पत्त्याचा प्रिव्ह्यू पाहू शकता. गरज पडल्यास स्थानिक भाषेमध्ये बदलही करू शकता. यानंतर अॅड्रेस व्हॅलिडेशन रिक्वेस्टला सबमिट करावे लागेल.
  12. ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर पोस्टाद्वारे नव्या पत्त्यावर व्हेरिफिकेशन लेटर पाठविण्यात येईल.या पत्रामध्ये एक सिक्रेट कोड असेल. 
  13. यानंतर पुन्हा तुम्हाला तीन टप्प्यातील Update Address बटनावर जाऊन लॉगईन करावे लागेल. यामध्ये तुम्हाला Have address validation letter असे दिसेल. त्याच्या समोरील चेक बॉक्सवर टीक करून सबमिट बटन दाबावे लागेल. 
  14. यानंतर तुम्हाला प्राप्त झालेला सिक्रेट कोड टाकावा लागेल. यानंतर व्हेरिफाय बटनावर क्लिक करून Proceed to Update Address बटनावर क्लिक करावे लागेल. 
  15. व्हेरिफाय झाल्यानंतर तुमच्या आधारवरील नवीन पत्ता अपडेट केला जाईल. याची सूचना आधार धारकाला मिळेल.
टॅग्स :Adhar Cardआधार कार्डtechnologyतंत्रज्ञान