शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पदांसाठी लाचार कसे होता : डांगे

By admin | Updated: March 16, 2016 08:36 IST

आयुष्यभर ज्यांना शिव्या घातल्या, त्यांच्याच पायाला पुन्हा लोणी लावण्याचे काम काही नेते करीत आहेत. एखाद्या समाजाचे नेतृत्व करताना पदांसाठी हे लोक लाचार कसे

सांगली : आयुष्यभर ज्यांना शिव्या घातल्या, त्यांच्याच पायाला पुन्हा लोणी लावण्याचे काम काही नेते करीत आहेत. एखाद्या समाजाचे नेतृत्व करताना पदांसाठी हे लोक लाचार कसे होतात? अशा पदांना लाथ मारून स्वाभिमानाने राजकारण करता आले पाहिजे, अशी टीका माजी मंत्री व राष्ट्रवादी नेते अण्णा डांगे यांनी रासपचे नेते महादेव जानकर यांचे नाव न घेता केली. काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवारांसोबत रासपचे नेते महादेव जानकर व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी हजेरी लावली होती. याच राजकारणाचा धागा पकडत डांगे म्हणाले की, महाराष्ट्रात हे कसले राजकारण सुरू आहे? मंत्रिपदासाठी केविलवाणी धडपड सुरू आहे. दुष्काळाच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांचे निर्णय चुकीचेच असले, तरी विरोधकांचा अकांडतांडवही काही बरोबर नाही. कॉँग्रेसनेही त्यांच्या सत्ताकाळात त्याच गोष्टी केल्या. विद्यमान मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांच्या कारकीर्दीत असेच निर्णय घेतले होते. दुष्काळावर राजकारण करण्यापेक्षा एकत्रित येऊन प्रश्न सोडविला पाहिजे. यापूर्वीही १९७२ च्या दुष्काळावेळी आम्ही आंदोलने केली होती. विधिमंडळातील चर्चा बंद करण्यापर्यंतचे राजकारण कोणाच्याही हिताचे नाही, असेही डांगे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)