शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'अंगणवाडी सेविकांना मेस्मा कसा लावता'?; धनंजय मुंडे,सुनिल तटकरे यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 18:47 IST

राज्यातील ७३ लाख बालकांना पोषण आहार देणाऱ्या आणि ३ लाख गर्भवती मातांची तपासणी करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना जुलमी मेस्मा लावताच कसा?

मुंबई- राज्यातील ७३ लाख बालकांना पोषण आहार देणाऱ्या आणि ३ लाख गर्भवती मातांची तपासणी करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना जुलमी मेस्मा लावताच कसा असा संतप्त सवाल करतानाच जर मेस्मा लावणार असाल तर इतर कर्मचाऱ्यासारखा सातवा वेतन आयोग लागू करा नाहीतर मेस्मा रद्द करा अशी जोरदार मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि आमदार सुनिल तटकरे यांनी सभागृहात लावून धरली. या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आक्रमक झाल्याने सभापतींनी चर्चा करण्याचे निर्देश दिले.

राज्यातील ९७ हजार अंगणवाडीमध्ये ७३ लाख बालकांना पोषण आहार देणे आणि ३ लाख गर्भवती महिलांची तपासणी करण्याचे काम करणाऱ्या हजारो अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावला गेला आहे. ही सरकारची हुकुमशाहीची सुरुवात आहे असेही धनंजय मुंडे म्हणाले. ३० वर्षांपासून ग्रामीण, दुर्गम भागात अंगणवाडी सेविका काम करत आहेत. चंद्रकांतदादा पाटील विरोधात असताना २० हजार रुपये मानधन देण्याची मागणी करत होते. आज सत्तेत आल्यानंतर त्यांना फक्त पाच हजार रुपयांचे तुटपुंजे मानधन दिले जातेय. मानधन वाढीसाठी सेविकांनी २६ दिवस आंदोलन केले होते. भविष्यात असे आंदोलन होवू नये म्हणून सरकार त्यांना मेस्मा लावत आहे. अंगणवाडी सेविकांची वयोमर्यादा ६५ वरुन ६० केली आहे. या निर्णयामुळे सरकारने एका झटक्यात १३ हजार सेविकांना घरी बसवले आहे. 

अंगणवाडी सेविकांमध्ये विधवा, परितक्त्या, एकटया राहणाऱ्या महिला काम करत असतात. या सेविकांना साधे समाधानकारक मानधनही दिले जात नाही. हा अन्याय आहे असेही धनंजय मुंडे म्हणाले.दरम्यान धनंजय मुंडे सभागृहात या प्रश्नावर आक्रमक झाले असतानाच आमदार सुनिल तटकरे यांनीही हा विषय उचलून धरत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी मेस्मा कायदा हा शासनाच्या नियमित सेवेत असणाऱ्या कर्मचार्यांसाठी असतो. सरकारने आता जाहीर करावे की अंगणवाडी सेविका या नियमित कर्मचारी आहेत आणि मग त्यांना मेस्मा लावावा अशी मागणीही सुनील सुनिल तटकरे यांनी केली.याविषयावर विधानपरिषदेत स्थगन प्रस्ताव मांडून चर्चा करण्याची मागणी करण्यात आली त्यावर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ९७ अन्वये अल्पकालीन अल्पकालीन चर्चेला परवानगी देवून मागणीला न्याय दिला.