शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

रुग्णालयांची झाडाझडती

By admin | Updated: May 22, 2017 04:05 IST

अँजिओप्लास्टीसाठी जुन्या आणि वापरलेल्या वैद्यकीय उपकरणांचा वापर रुग्णालयांकडून केला जात असल्याचे अलीकडेच समोर आले होते

मुंबई : अँजिओप्लास्टीसाठी जुन्या आणि वापरलेल्या वैद्यकीय उपकरणांचा वापर रुग्णालयांकडून केला जात असल्याचे अलीकडेच समोर आले होते. या पार्श्वभूमीवर आता अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (एफडीए) राज्यभरातील रुग्णालयांची झाडाझडती सुरू केली आहे. या तपासणी मोहिमेत वैद्यकीय साहित्याच्या पुनर्वापरावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.एफडीएने केलेल्या कारवाईत अँजिओप्लास्टीसाठी जुने आणि वापरलेले बलून कॅथेटर आणि गायडिंग कॅथेटरचा वापर केला जात असल्याचे उघड झाले आहे. रुग्णालयांकडून कॅथेटरचा पुनर्वापर करतानाच त्याची किंमतही पुरेपूर वसूल केली जात असल्याचीही माहिती समोर आल्यानंतर एफडीएने त्या रुग्णालयांना नोटीसही बजावली होती. तसेच, मागील महिन्यात घाटकोपर येथील रुबी डायग्नॉस्टिक सेंटरवरही एफडीएने छापा टाकला. या वेळी येथे गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या आणि शेड्यूल एच-१मध्ये मोडणाऱ्या एमटीपी किट्सचा अवैध साठा जप्त करण्यात आला. एफडीएने आता राज्यभरातील रुग्णालयांत यासंबंधी तपासणी मोहीम सुरू केली आहे. यात वैद्यकीय साहित्याचा होणारा वापर-पुनर्वापर, तसेच या साहित्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क या गोष्टी पडताळणार आहेत. मोहिमेच्या अंतिम टप्प्यात याविषयी अहवाल सादर करण्यात येईल, अशी माहिती एफडीएचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी ‘लोकमत’ला दिली. एफडीएच्या तपासणी मोहितमेत नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि मुंबई येथील रुग्णालयांत वैद्यकीय साहित्याचा पुनर्वापर करणारी रुग्णालये आढळली आहेत. मात्र अजून तपासणीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती डॉ. कांबळे यांनी दिली.कॅथेटर वा स्टेंट या वैद्यकीय साहित्यांचा पुनर्वापर करून त्याचे रुग्णांकडून शुल्कही आकारणे हे चुकीचेच आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाची ही मोहीम उपयुक्त ठरेल.- डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता, जे.जे. रुग्णालयज्या रुग्णांना वैद्यकीय साहित्य परवडत नाही अशा प्रकरणांमध्ये त्यांना स्वस्त उपकरणे देण्याच्या निमित्ताने त्यांच्याकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाते. या शुल्क आकारणीला आळा घातला पाहिजे, ते या मोहिमेतून साध्य होईल.- डॉ. नारायण गडकर, हृदयरोगतज्ज्ञकॅथेटर वा स्टेंट या वैद्यकीय साहित्यांचा पुनर्वापर करूनही त्यांची पूर्ण किंमत रुग्णांकडून आकारली जायची, हा सर्व प्रकार म्हणजे रुग्णांची फसवणूक आहे.- डॉ. जयेश लेले, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन (महाराष्ट्र)रुग्णांची लूटच्फोर्टिस रुग्णालयाने ४५ रुग्णांवर ६६ कॅथेटरचा तर हिरानंदानी रुग्णालयाने २७ रुग्णांवर ४४ कॅथेटरचा पुनर्वापर करत अँजिओप्लास्टी केल्याचे एफडीएच्या चौकशीतून समोर आले होते. तीन रुग्णालयांमध्ये वापरलेले कॅथेटर पुन्हा वापरले जात असून त्याची किंमत मात्र पूर्णपणे वसूल केली जात होती. च्अंदाजे ९ हजार रुपये अशी कॅथेटरची मूळ किंमत असताना यासाठी २५ हजारांपर्यंत रक्कम उकळली जात होती. तसेच, कॅथेटरच्या खरेदी-विक्रीची योग्य माहितीही उपलब्ध नसल्याचे एफडीएच्या निदर्शनास आले.