शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आशेची चाके, निराशेचे डबे!

By admin | Updated: July 9, 2014 02:49 IST

मुंबई, नागपूर, पुणो, नाशिक ही स्थानके देश व राज्यांतर्गत रेल्वेमार्गाशी नव्याने जोडली जातील ही अपेक्षा सपशेल फोल ठरली.

रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
मोदी सरकारच्या पहिल्या रेल्वे अर्थसंकल्पाने महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली. ‘अच्छे दिन आयेंगे’ म्हणत दिल्लीचे तख्त काबीज केलेल्या मोदींची एक्स्प्रेस महाराष्ट्रातील आगामी निवडणुका लक्षात घेऊन राज्यात भरधाव धावेल, अनेक मोठय़ा स्थानकांवर थांबेल, मुंबई, नागपूर, पुणो, नाशिक ही स्थानके देश व राज्यांतर्गत रेल्वेमार्गाशी नव्याने जोडली जातील ही अपेक्षा सपशेल फोल ठरली.
 
विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणाकडे साफ दुर्लक्ष केले गेले. मुंबईतून अहमदाबादच्या दिशेने धावणा:या बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखविणारी ही एक्स्प्रेस  राज्यातील सर्वसामान्य लोकांच्या भागात थांबलेलीच नाही. साहजिकच महाराष्ट्रातील खासदारांची नाराजी लपून राहिलेली नाही.
 रेल्वेमंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांना दिलेल्या प्रस्तावाचे काय झाले असा जाब विचारू अशी भूमिका काहींनी घेतली आहे. शिवसेनेचे खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ‘महाराष्ट्राच्या विकासाचे प्रकल्प या बजेटमध्ये नाहीत,’ अशी जाहीर नाराजी व्यक्त केली. माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी, ‘हे निराशाजनक बजेट असून, सामान्य माणसांच्या अपेक्षांची घोर निराशा झाली,’ अशी नाराजी व्यक्त केली. सत्तारूढ पक्षातच नाराजी उमटत असताना आषाढी एकादशीच्या पुढय़ात चांगली घटना पर्यटक व भाविकांच्या दृष्टीने म्हणता येईल, ती म्हणजे तीर्थक्षेत्रे जोडण्याच्या परिक्रमेत पंढरपूर हे तीर्थक्षेत्र जोडले जाणार आहे. बागलकोट-विजापूर-सोलापूर-गदग मार्गे पंढरपूर अशी पर्यटन रेल्वे सुरू होणार असून, ती कर्नाटक ते महाराष्ट्र असा प्रवास करेल. मात्र इकोटुरिझम, शैक्षणिक सहल या नवीन रेल्वे गाडय़ांच्या मार्गातून संतभूमी, शैक्षणिक समृद्धी व पुरोगामी असलेल्या महाराष्ट्राला वगळण्यात आले.
 
मुंबई-अहमदाबाद मार्गावर देशातील पहिली बुलेट ट्रेन धावणार, पण त्यासाठी 9 लाख कोटींची गरज
 
‘मुंगेरीलाल के हसीन सपने’
जनसाधारण, प्रीमियम, एसी, एक्स्प्रेस, मेमू, डेमू व सध्याच्या रेल्वेगाडय़ांचा स्थानकांचा विस्तार आणि नव्या मार्गाचे सव्र्हेक्षण करण्याचा प्रयत्न होत असला तरी महाराष्ट्राच्या वाटय़ाला कमालीची निराशा आली आहे. रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण, तिसरी-चौथी लाइन व विद्युतीकरण करण्याच्या सुविधेचा लाभही राज्याला अत्यंत निसटता मिळाला आहे. मोठय़ा उत्साहात राज्यातील खासदारांनी आपल्या भागातील प्रस्ताव दिले होते, पण प्रत्यक्षात ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ असाच प्रकार झालेला आहे. 
 
सव्र्हेक्षणातही निराशा
मुंबईसह देशातील 1क् महानगरांना जोडणारी हीरक चतुभरुज योजना रेल्वे मंत्रलयाने तयार केली आहे. त्यात मुंबई-नागपूर, मुंबई-पुणो व मुंबई-औरंगाबादचा विचार झालेला नाही. देशभरात 18 नवीन रेल्वे मार्गाचे सव्र्हेक्षण होणार आहे, त्यापैकी राज्यातील औरंगाबाद-चाळीसगाव व सोलापूर-तुळजापूर या दोन मार्गाचेच सव्र्हेक्षण होणार आहे. राज्यातून 1क् मार्गाच्या सव्र्हेक्षणाची अपेक्षा करण्यात आली होती. 
 
स्थानकांवर सुविधांची रेलचेल
ए-1 व ए श्रेणीच्या रेल्वे स्थानकांवर वायफाय सेवा, प्रसिद्ध कंपन्यांची रेडी टू ईट भोजन सुविधा, 5क् मोठय़ा स्थानकांवरील साफसफाईच्या कामाचे आऊट सोर्सिग, क्लोज सर्किट टीव्हीद्वारे स्वच्छतेच्या कामावर लक्ष ठेवणो, रेल्वे व स्थानकांवर आरओ पेयजल सुविधा व रेल्वे स्थानकांची देखभाल करण्यासाठी प्रतिष्ठित बिगर सरकारी संघटना, धर्मादाय संस्था व कंपन्यांना जोडण्याच्या दिशेने पाऊल उचलण्यात येईल, असे गौडा यांनी जाहीर केले.
 
‘खासगी’ एक्स्प्रेस
रेल्वेत खासगी व विदेशी थेट गुंतवणुकीचा प्रस्ताव मांडताना गौडा पुढे म्हणाले, आम्ही केंद्रीय मंत्रिमंडळाकडे रेल्वेत विदेशी थेट गुंतवणुकीची परवानगी मागणार आहोत. ही विदेशी थेट गुंतवणूक केवळ पायाभूत विकासार्पयतच मर्यादित राहील व परिचालन कार्यात एफडीआयला परवानगी मिळणार नाही.
 
94 पैसे खर्च; 6 पैसे फायदा
सध्या रेल्वेच्या प्रत्येक 1 रुपयाच्या उत्पन्नापैकी 94 पैसे परिचालनावर खर्च केले जातात. त्यामुळे पेन्शन व लाभांशाची तरतूद केल्यानंतर रेल्वेच्या विकासासाठी आंतरिक संसाधनांची बचत फारच कमी राहते. 
 
सेन्सेक्सचा रिव्हर्स गिअर
रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वे उद्योगाशी संबंधित ठोस घोषणा न झाल्याचे पडसाद मुंबई शेअर बाजाराच्या कामगिरीवर उमटले व 518 अंशांची घसरण नोंदवित बाजार बंद होतेवेळी सेन्सेक्स 25,582 अंशांवर स्थिरावला. सोमवारच्या ऐतिहासिक उच्चंकानंतर मंगळवारी 1क् महिन्यांतील नीचांकी घसरण नोंदली गेली. -वृत्त/15
 
रेल्वेची वित्तीय स्थिती गंभीर आहे. त्यासाठी खासगी व विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याचा प्रस्ताव आहे. रेल्वेत एफडीआयवर बंदी आहे. ती उठविण्याची विनंती आम्ही वाणिज्य मंत्रलयाला करू.  
- सदानंद गौडा, रेल्वेमंत्री
 
भविष्याचा वेध घेणारे बजेट
रेल्वे अर्थसंकल्प भविष्याचा वेध घेणारा आणि विकासोन्मुख आहे. आम्हाला रेल्वेला कुठे घेऊन जायचे आहे आणि त्याचवेळी रेल्वेच्या माध्यमातून भारताला कुठे घेऊन जायचे आहे हे या अर्थसंकल्पातून दिसून येते. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान 
 
महानगरी हायस्पीडवर
नऊ प्रमुख महानगरे तसेच विकास केंद्रांना जोडणा:या हायस्पीड रेल्वे चालविणार. 
16क् ते 2क्क् किमी ताशी वेगाने धावणा:या सेमी हायस्पीड रेल्वे सुरू करणार.
 
बुकिंग सुपरफास्ट
ऑनलाइन बुकिंगची 
क्षमता वाढणाऱ दर मिनिटाला 72क्क् तिकिटे बुक केली जातील़ तसेच एकाचवेळी 1.2क्  लाख लोक बुकिंग करू शकतील़
 
प्रवासांची निश्चिंती
इंटरनेटद्वारे प्लॅटफॉर्म 
आणि अनारक्षित तिकिटेही मिळतील़ विश्रमगृहांचे ई-बुकिंग करता येणार. 
मोबाइल, पोस्ट ऑफिसातही ई-बुकिंग होणार.
 
प्रवाशांना वेक अप कॉल
प्रवाशांना ‘वेक अप 
कॉल’ तसेच मुक्कामी पोहोचल्याची माहिती मिळणार. ईमेल, एसएमएस आणि स्मार्टफोनद्वारे जेवणाची ऑर्डर देता येणाऱ
 
धर्मस्थळांचे रेल्वेसर्किट
धर्मस्थळे व पर्यटनस्थळे जोडणारे रेल्वेसर्किट तयार करणाऱ देवी सर्किट, जैन सर्किट, ज्योतिर्लिग सर्किट, शीख सर्किट, मुस्लीम सर्किट, बौद्ध सर्किटसाठी विशेष गाडय़ा.