शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळ्यातील लायन्स पॉइंटवर खुलेआम निघतोय हुक्क्याचा धूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2017 10:13 IST

लोणावळ्यातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र असलेल्या लायन्स पॉईटवर आज थर्टी फस्टच्या पुर्वसंध्येला खुलेआम हुक्क्यांचा धूर निघत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते.

लोणावळा : लोणावळ्यातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र असलेल्या लायन्स पॉईटवर आज थर्टी फस्टच्या पुर्वसंध्येला खुलेआम हुक्क्यांचा धूर निघत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. सायंकाळच्या सत्रात लायन्स पॉईटवर सनसेट पाहण्याकरिता तोबा गर्दी झाली होती.पर्यटनाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या लोणावळा शहरात थर्टी फस्ट व नविन वर्षाचे सेलिब्रेशन करण्याकरिता मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागताकरिता सज्ज झालेले बहुतांश सर्व हॉटेल, सेनेटोरियम, बंगले, सेकंड होम पर्यटकांनी गजबजली आहेत. पर्यटकांचे आकर्षण असलेला भुशी धरणाचा परिसर, लायन्स पॉईट, शिवलिंग पॉईट, गिधाड तलाव, खंडाळ्यातील राजमाची गार्डन, ड्युक्स नोज व सनसेट पॉईट ही ठिकाणे पर्यटकांनी फुल झाली होती. लायन्स पॉईट येथे पोलीस प्रशासन तसेच वन विभागाचा कसलाही अंकूश नसल्याने खुलेआम उघड्यावर हुक्का पिणार्‍याची जत्राच बसली असल्याचे चित्र पहायला मिळत होते. कौठुंबिक पर्यटकांच्या समोर काही युवक व युवती खुलेआम टेबलवर हुक्का ठेवत धूर काढत होते तर स्थानिक व्यावसायीक त्यांना आवश्यक ते साहित्य पुरवत होते. काही उच्चभ्रु पर्यटक मोकळ्या मैदानात दारु पित हुक्क्याचा धूर काढत होते. अनेक उत्साही तरुण लायन्स पॉईटच्या कड्याला लावलेले लोखंडी रेलिंगच्या पुढे जाऊन धोकादायकपणे सेल्फी काढत होते.वन विभागाच्या ताब्यात असलेले लायन्स पॉईट हे ठिकाणी लोणावळा शहरापासून बारा किमी अंतरावर असून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. आज थर्टी फस्टच्या पुर्वसंध्येला याठिकाणी हजारो लोक एकत्र आले होते. काही जण गाडीमधील म्युझिम सिस्टिमचा आवाज मोठा करुन नाचत होते तर काही जण दारु पित होते, हुक्का ओढत होते असे विदारक चित्र पहायला मिळाले. लायन्स पॉईटची नाईट लाईफ मोडून काढण्याकरिता मागीला काळात पोलीसांनी कारवाया केल्या होत्या. सायंकाळी सातनंतर हा परिसर निमनुर्ष्य करण्याचे फलक गेटवर झळकत असले तरी वास्तवात रात्रभर याठिकाणी दारु व हुक्क्याच्या पार्ट्या सर्रास सुरु असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक पोलीसांच्या व वन विभागाच्या अधिकार्‍यांना हाताशी धरुनच काही व्यावसायीक याठिकाणी दारु व हुक्का पुरवत असल्याची शहरात चर्चा आहे. पार्किंगचा गोरखधंदा तेजीतलायन्स पॉईट याठिकाणी संयक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून येणार्‍या वाहनांकडून पावती देऊन पार्किंगचे पैसे गोळा केले जातात. आज मात्र लायन्स पॉईटवर पाहणी केली असता वाहनचालकांना कसलिही पावती न देता सर्रास पैसे गोळा करण्याचा प्रकार सुरु असल्याचे पहायला मिळाले. हा पैसा नेमका कोणाच्या खिशात जाणार हा संशोधनाचा विषय असला तरी विकासाच्या नावाखाली जमा केला जाणारा पैसा लाटण्याचा गोरख धंदा याठिकाणी सुरु असल्याचे पहायला मिळाले.