शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

सर्वोच्च राष्ट्रपती मानकाने लष्करी संस्थेचा गौरव

By admin | Updated: April 16, 2017 01:16 IST

राष्ट्रपती व तिन्ही सेनादलांचे प्रमुख प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते येथील एसीसी अ‍ॅण्ड एस या लष्करी प्रशिक्षण संस्थेला सर्वोच्च राष्ट्रपती मानकाने गौरवण्यात आले.

अहमदनगर : राष्ट्रपती व तिन्ही सेनादलांचे प्रमुख प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते येथील एसीसी अ‍ॅण्ड एस या लष्करी प्रशिक्षण संस्थेला सर्वोच्च राष्ट्रपती मानकाने गौरवण्यात आले. शनिवारी झालेल्या एका शानदार सोहळ्यात लष्कराचे उत्कृष्ट संचलन, रणगाड्यांचा ताफा, हेलिकॉप्टर व सुखोई हवाई विमानाच्या चित्तथरारक कसरतीने उपस्थित भारावले. सन १९४८पासून देशसेवेत समर्पित आर्मर्ड कोअर सेंटरने त्याग, समर्पण, व्यावसायिक कौशल्य आणि नि:स्वार्थ सेवेचा आदर्श घातला आहे. एक शांतताप्रिय देश म्हणून राष्ट्राचे सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय ऐक्य कायम ठेवण्यासाठी आपल्या क्षमतेचा उत्तम रीतीने उपयोग केला आहे. नव्या आव्हानांना तोंड देत एसीसीएस भविष्यातही आपली गौरवशाली परंपरा पुढे नेण्यात यशस्वी होईल, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले. येथील आर्मर्ड कार्प सेंटर अ‍ॅण्ड स्कूल या देशातील उत्कृष्ट लष्करी प्रशिक्षण संस्थेला शनिवारी सकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रपती मानक देऊन गौरविण्यात आले. एसीसी अ‍ॅण्ड एसचे कमांडिंग आॅफिसर मेजर जनरल प्रवीण दीक्षित यांनी हा मानाचा ध्वज स्वीकारला. प्रथम सैनिकांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत, लेफ्टनंट जनरल पी. एम. हैरिज, लेफ्ट. जनरल डी. आर. सोनी आदी प्रमुख पाहुण्यांना सलामी दिली. राष्ट्रपतींचे मानक मिळणे हे कोणत्याही सैनिक तुकडीचा सर्वोच्च सन्मान व दुर्मीळ क्षण असतो. सैनिकांचे मनोधैर्य वाढवण्याचे काम हे निशाण करते. पथसंचलनाचे नेतृत्व ब्रिगेडिअर संदीप झुंझा यांनी केले. संचलनात घोडेस्वार, लढाऊ रणगाडे तसेच जवानांनी विविध कसरती दाखवत सैन्य सज्जतेची झलक दाखवली. लढाऊ सुखोई विमान तसेच चेतक हेलिकॉप्टरने आकाशातून ध्वजवहन करून सामर्थ्य प्रदर्शित केले. प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ‘फर्स्ट डे कव्हर’चे अनावरण करण्यात झाले. ६९ वर्षांच्या कामगिरीच्या आधारे संस्थेला हा सर्वोच्च बहुमान पहिल्यांदाच मिळाला आहे. संस्थेला २ व्हिक्टोरिया क्रॉस, २ परमवीर चक्र, १६ महावीर चक्र तसेच ५२ वीर चक्रांनी सन्मानित करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)‘एसीसीएस’च्या कामगिरीची ६९ वर्षेअर्जुन, टी ९०, टी ७२, भीष्म, अजेय आदी अनेक भेदक रणगाडे एसीसीएसच्या ताफ्यात आहेत. भारतीय लष्कराबरोबरच मित्रराष्ट्रांच्या अधिकाऱ्यांना येथे प्रशिक्षण दिले जाते.- अहमदनगर येथील आर्मर्ड कार्प सेंटर अ‍ॅण्ड स्कूल या देशातील उत्कृष्ट लष्करी प्रशिक्षण संस्थेला शनिवारी सकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रपती मानक देऊन गौरविण्यात आले. एसीसी अ‍ॅण्ड एसचे कमांडिंग आॅफिसर मेजर जनरल प्रवीण दीक्षित, लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी यांनी हा मानाचा ध्वज स्वीकारला.