शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

घरमालकाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार

By admin | Updated: April 30, 2017 03:25 IST

वडील आणि भावाला मारून घराबाहेर काढण्याची धमकी देत, ५० वर्षीय घरमालकाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना भायखळ्यात घडली.

मुंबई : वडील आणि भावाला मारून घराबाहेर काढण्याची धमकी देत, ५० वर्षीय घरमालकाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना भायखळ्यात घडली. मुलगी आठ महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर, शुक्रवारी हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी घरमालक मोहम्मद हसन अब्दुला शेख (५०) या पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. माझगाव परिसरातील एका झोपडीत तक्रारदार नेहा (नावात बदल) वडील आणि भावासोबत भाड्याने राहते. हे घर शेखच्या मालकीचे आहे. २०१६ मध्ये वडील आणि भाऊ कामानिमित्त घराबाहेर गेले असता, शेखने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास वडील आणि भावाला मारून घराबाहेर काढण्याची धमकी त्याने दिली, तसेच बदनामीची भीती घातली. त्यामुळे मुलगी घाबरून गप्प राहिल्याचे आता उघडकीस आले आहे. (प्रतिनिधी)अल्पवयीन मुलाकडून चिमुरडीवर अत्याचारमाहीम परिसरात शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ७ वर्षांची चिमुरडी मैदानात खेळत असताना, १५ वर्षांच्या मुलाने तिला निर्जन स्थळी नेत, तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यात ती जखमी झाली आहे. मुलगी घरी आली नाही, म्हणून कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. रात्री उशिराने ती रडत घरी परतली, तेव्हा तिने झालेला प्रकार सांगितला. या प्रकरणी कुटुंबीयांनी माहीम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन, त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.