शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

होमी व्यारावाला यांना डूडलद्वारे सलाम, पहिल्या महिला वृत्तपत्र छायाचित्रकाराला गूगलची आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 05:06 IST

देशाच्या पहिला महिला वृत्तपत्र छायाचित्रकार होमी व्यारावाला यांचा शनिवारी १०४ वा जन्मदिन होता. या निमित्ताने गूगलने त्यांचे अनोखे डुडल तयार करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशाच्या पहिला महिला वृत्तपत्र छायाचित्रकार होमी व्यारावाला यांचा शनिवारी १०४ वा जन्मदिन होता. या निमित्ताने गूगलने त्यांचे अनोखे डुडल तयार करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. होमी व्यारावाला यांचा जन्म गुजरातमध्ये ९ डिसेंबर १९१३ रोजी झाला होता.होमी व्यारावाला यांचे वडील एका थिएटर कंपनीचे मालक होते. वडिलांसोबत होमी यांनी लहानपणी भरपूर प्रवास केला. यानंतर,त्यांचे वडील मुंबईत स्थायिक झाले. येथे त्यांनी मुंबई विद्यापीठ आणिसर जे. जे. स्कूल आॅफ आर्ट्समधून शिक्षण घेतले. छायाचित्रण शिकल्यानंतर त्यांनी कॅमेºयात मुंबईतील जनजीवन टिपणे सुरू केले. काही काळातच त्यांना नोकरी मिळाली. १९३०च्या दशकात त्यांनी आपल्या करिअरला सुरुवातकेली होती. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर त्यांनी मुंबईतील ‘द इलस्ट्रेटेड विकली आॅफ इंडिया’या नियतकालिकासाठी काम करणे सुरू केले. करिअरच्या सुरुवातीला त्यांना कोणीही ओळखत नव्हते.त्यांचे फोटोज त्यांच्या पतीच्यानावाने प्रकाशित केले जात होते.त्यांनी ‘टाइम्स आॅफ इंडिया’च्याएका फोटोग्राफर अकाउंटंटशी लग्न केले होते.होमी व्यारावाला यांना पुढे राष्ट्रीय स्तरावर छायाचित्रणासाठी ओळख मिळाली. १९४२ मध्ये त्या आपल्या कुटुंबासह ब्रिटिश सूचना सेवेसाठी काम करण्यासाठी दिल्लीला आल्या. दिल्लीत विविध कार्यक्रमासाठी आलेल्या चीनचे हो ची मिन्ह, अमेरिकी राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर आणि जॉन एफ. केनेडी यांचेही त्यांनी सुंदर फोटो टिपले. त्यांना महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची भारत यात्रा आणि दलाई लामा तिबेटमधून निघतानाचे फोटो टिपण्याचीही संधी मिळाली. १९७० मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले. यानंतर १९८२ मध्ये त्या आपला मुलगा फारुकसह बडोद्यात स्थायिक झाल्या. १५ जानेवारी २०१२ रोजी त्यांचे निधन झाले आणि एका उमद्या महिला वृत्तपत्र छायाचित्रकाराने जगाचा निरोप घेतला.

टॅग्स :Mumbaiमुंबई