श्रीरामपूर (अहमदनगर) : गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या वाहनांच्या ताफ्यामध्ये शनिवारी मारूती कार घुसून एक जण जागीच ठार झाला तर ७ जण पोलिस जखमी झाले. टाकळीभान गावाजवळ अपघात झाला. शिंदे हे कोपरगाव, शिर्डीचे कार्यक्रम आटोपून नेवाशाकडे निघाले होते. तेव्हा नेवाशाकडून येणाऱ्या मारूती अल्टो कारच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. मारुती कार मंत्र्यांच्या ताफ्यातील सर्वात शेवटच्या पोलिसांच्या सुमो जीपसमोर आली व तिला धडक बसली. त्यात चार पोलिसांसह एकूण सात जण जखमी झाले. अपघातात मारूती कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. मारुती गाडीतील अशोक जयराम धावडे (४०) यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींवर श्रीरामपूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)
गृह राज्यमंत्र्यांच्या ताफ्याला अपघात; एक जण ठार
By admin | Updated: May 8, 2016 03:38 IST