बालीका एचआयव्ही बाधित प्रकरण;  आरोग्यमंत्र्यांनी घेतली दखल; चौकशीचे आदेश जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:50 PM2021-09-02T17:50:27+5:302021-09-02T17:50:34+5:30

Rajesh tope orders enquiry : आठ महिन्याच्या चिमुकलीला संक्रमित रक्त चढवल्याने ती एचआयव्ही बाधित झाली हे वृत्त सर्व प्रथम १ अॉगष्ट 'लोकमत'ने प्रकाशित केले.

HIV-infected girls; Health Minister took notice; Inquiry order issued | बालीका एचआयव्ही बाधित प्रकरण;  आरोग्यमंत्र्यांनी घेतली दखल; चौकशीचे आदेश जारी

बालीका एचआयव्ही बाधित प्रकरण;  आरोग्यमंत्र्यांनी घेतली दखल; चौकशीचे आदेश जारी

Next

-संजय उमक

मूर्तिजापूर : तालुक्यातील हिरपुर येथील एका आठ महिन्याच्या चिमुकलीला संक्रमित रक्त चढवल्याने ती एचआयव्ही बाधित झाली हे वृत्त सर्व प्रथम १ अॉगष्ट 'लोकमत'ने प्रकाशित केले. या गंभीर बाबीची दखल घेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दखल घेऊन या प्रकरणी चौकशीचे आदेश जारी केले आहेत. 
        तालुक्यातल्या हिरपूर येथील एका आठ महिन्याच्या चिमुकलीला एचआयव्ही संक्रमित व्यक्तीचे रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला या प्रकरणी पीडित चिमुकलीच्या नातेवाईकांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे बुधवारी तक्रार दाखल केली व 'लोकमत'ने त्याच दिवशी वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर या प्रकरणाची आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली असून याची चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे माध्यमांशी बोलताना दिली.  ते म्हणाले की, या बाबत अतिशय गंभीर दखल घेतली आहे. एका लहान मुलीला पांढऱ्या पेशी कमी झाल्याने रक्त देण्यात आलं होतं यासंदर्भात फुड ड्रग्ज अथारिटी (एफडीए) व स्थानिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचित करून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत येत्या दोन तीन दिवसात त्याचा अहवाल प्राप्त होईल त्या नुसार कारवाई केल्या जाईल. ब्लड बँकेने रक्तदात्याकडून रक्त घेताना एचआयव्ही टेस्ट करुन रक्त स्विकारणे आवश्यक होते त्याच बरोबर ज्या खासगी रुग्णालयात त्या बालीकेचा उपचार सुरु होता त्या रुग्णालयाने रक्ताची सॅम्पल टेस्ट करणे आवश्यक होते यात हलगर्जीपणा झाल्याचे दिसून येते याची पुर्ण चौकशी करु कठोर कारवाई करण्यात येईल.
----------------------
असे आहे प्रकरण 

हिरपुर येथील एका आठ महिन्याच्या बालीकेला येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी पांढऱ्या पेशी कमी असल्याचे सांगून अकोला येथील बी पी ठाकरे रक्त पेढी मधून पांढरे रक्त बोलावण्यात आले परंतु ते रक्त एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याने आठ वर्षांच्या निष्पाप बालीकेलाही एचआयव्ही संक्रमित व्हावे लागले. यासंदर्भात चिमुकलीच्या पित्याने आरोग्य मंत्र्यांसह विविध ठिकाणी न्याय मागीला आहे. 
 
रक्तपेढीसह डॉक्टर होणार कारवाई

या प्रकरणी रक्त दात्याकडून रक्त घेणारी रक्तपेढीसह त्या चिमुकलीला उपचारा दरम्यान रक्त चढविणाऱ्या मूर्तिजापूर येथील डॉ. प्रशांत अवघाते यांच्यावरही कारवाई होणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. यात रक्तपेढी व रक्त चढविणारे डॉक्टर तेवढेच दोषी असल्याचे बोलल्या जाते

Web Title: HIV-infected girls; Health Minister took notice; Inquiry order issued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.