शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे बंधु एकत्र आल्यास इतिहास घडेल - मनोहर जोशी

By admin | Updated: January 28, 2017 16:13 IST

‘शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोघा बंधुनी एकत्र यावे अशी सर्वांची इच्छा आहे. ते दोघे एकत्र आल्यास राज्याच्या राजकारणात इतिहास घडेल.

ऑनलाइन लोकमत 
पुणे, दि. 28 -  ‘शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोघा बंधुनी एकत्र यावे अशी सर्वांची इच्छा आहे. ते दोघे एकत्र आल्यास राज्याच्या राजकारणात इतिहास घडेल. मात्र, त्यासाठी दोघांची इच्छा असणे महत्वाचे आहे,’ असे वक्तव्य शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी शनिवारी केले.
 
येथील डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्टतर्फे आयोजित दुस-या युवा संसदेच्या उदघाटनापुर्वी जोशी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. युती तुटल्याच्या पार्श्वभुमीवर दोन्ही ठाकरे बंधु एकत्र येतील की नाही, यावर तर्कवितर्क लढविले जात आहेत. याविषयी विचारले असता जोशी म्हणाले, दोघांनी एकत्र यावे अशी शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांची  इच्छा आहे. मात्र यासाठी त्या दोघांची इच्छा असणे महत्वाचे आहे. त्यासाठी मी मध्यस्थी करणार नाही. दोघे एकत्र आले तर यश अधिक जवळ येईल. राज्याच्या राजकारणात इतिहास घडेल.
 
दोन्ही पक्षांचे ध्येयवाद एक असताना वेगळे झाल्यावर नुकसान होते. मात्र, युती तुटल्याने शिवसेनेचे नुकसान होणार नाही. या निर्णयामुळे शिवसेनेमध्ये आनंदाचे वातावरण असून त्याचा नक्कीच फायदा होईल. मी ज्योतिषी नसलो तरी ज्यो्ितष म्हणून सांगतो, मुंबई महापालिका निवडणुकीत एकटी शिवसेना सर्वाधिक जागा मिळवेल, असा विश्वास जोशी यांनी व्यक्त केला. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे शिवसेनेचा कारभार समर्थपणे चालवत आहेत. युतीत पंचवीस वर्ष सडली या त्यांच्या मताशी सहमत असल्याचेही जोशी यांनी नमुद केले.
 
शिक्षण विभागाशी संबंधित अनेक निर्णय मागे घेण्यात आले. यावर कुणाचेही नाव न घेता जोशी म्हणाले, शिकलेला, हुशार माणूस मंत्री व्हायला हवा. निर्णय घेण्याची कुवत नसणारी माणसे मंत्री होत असल्याने निर्णय चुकत आहेत. मंत्रीपद देण्याची जबाबदारी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि संबंधित पक्षाची असते. सोयीनुसार मंत्री नेमण्यापेक्षा देश पुढे नेतील अशा लोकांनाच मंत्रीपद द्यावे, अशी टीकाही जोशी यांनी यावेळी केली.