शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

‘लायगो’ वेधशाळा २०२५ पर्यंत उभारणार, हिंगोलीचे नाव आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 03:17 IST

गुरुत्व लहरींचा अभ्यास करणा-या ‘लेसर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह आॅब्झर्व्हेटरी (लायगो) या भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय वेधशाळेची उभारणी २०२५ पर्यंत पुर्ण करण्याची उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी जगभरातील विविध संशोधन संस्था व विद्यापीठांचे सहकार्य मिळणार आहे.

पुणे : गुरुत्व लहरींचा अभ्यास करणा-या ‘लेसर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह आॅब्झर्व्हेटरी (लायगो) या भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय वेधशाळेची उभारणी २०२५ पर्यंत पुर्ण करण्याची उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी जगभरातील विविध संशोधन संस्था व विद्यापीठांचे सहकार्य मिळणार आहे.अमेरिकेमध्ये दोन लायगो वेधशाळा यापुर्वीपासून गुरुत्वीय लहरींचा वेध घेत आहेत. त्यामुळे भारतात होणारी ही अमेरिकेबाहेरील पहिली व जगातील तिसरी वेधशाळा ठरणार आहे. महाराष्ट्रतील हिंगोली जिल्ह्यात ही वेधशाळा उभारण्याबाबत मागील काही महिन्यांपासून हालचाली सुरू आहेत. मात्र, अद्याप अधिकृतपणे ठिकाणाची घोषणा करण्यात आलेली नाही. लायगो वेधशाळेने मागील वर्षी दोन मोठ्या कृष्णविवरांच्या टकरीतून निर्माण झालेल्या गुरूत्वीय लहरींचा पहिल्यांदाच शोध लावला होता. या संशोधनाला यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे.पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, भारतातील नवीन वेधशाळेचे ठिकाणी निश्चित झाले असून त्यावर कामही सुरू करण्यात आले आहे. जेव्हा ही वेधशाळा २०२५ मध्ये कार्यान्वित होईल. त्याचे व्यवस्थापन ‘आयुका’कडे असेल, असे पुण्यातील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्टॉनॉमी अ‍ॅन्ड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स (आयुका)चे संचालक सोमक रायचौधरी यांनी सांगितले. भविष्यात वेध घेतल्या जाणाºया गुरूत्वीय लहरींचे मुळ शोधण्यासाठी या नवीन अत्याधुनिक वेधशाळेची मदत होणार आहे. लहरींच्या संशोधनासाठी उच्च कौशल्याची गरज असते. त्यासाठी या क्षेत्रातील संशोधकांना उच्च स्तरीय प्रशिक्षण देता येणार आहे. केवळ वेधशाळा उभारण्यासाठीच नव्हे तर २०२५ नंतर त्यामध्ये संशोधनासाठी किमान शंभर तरूण संशोधकांची गरज आहे, अशी माहिती रायचौधरी यांनी दिली.